का केली 'या' कलाकाराने 'एअर इंडिया'वर टीका

वृत्तसंस्था
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

आज काल प्रवास झाल्यावर लोक मला मी कसा आहे असे विचारत नाहीत, तर 'वाद्ये कशी आहेत?

न्यूयॉर्क : विमान प्रवासादरम्यान सतार तुटल्याबद्दल प्रसिद्ध सतारवादक शुभेंद्र राव यांनी एअर इंडियावर टीका केली आहे. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी संगीत वाद्ये हाताळताना संवेदनशील असले पाहिजे, असे राव यांनी सोशल मीडियावरून टीका करताना म्हटले आहे. 

- महिला कर्मचाऱ्यासोबत संबंध ठेवणे भोवले

एका कार्यक्रमात सादरीकरण करण्यासाठी शुभेंद्र राव हे एअर इंडियाच्या विमानातून न्यूयॉर्कला गेले. यावेळी त्यांची सतार आणि इतर उपकरणे सामानात ठेवली होती. न्यूयॉर्कमध्ये सामान हाती लागताच सतारीला तडे गेल्याचे राव यांच्या लक्षात आले आणि त्यांनी संताप व्यक्त केला.

- दहशतवादी संघटनांवर पाकचा अंकुश नाही - अमेरिका

फेसबुकवर याबाबत माहिती देताना राव म्हणाले, "प्रवासात दुसऱ्यांदा माझी सतार तुटली आहे. यावेळी हे काम आपल्याच एअर इंडियाने केले आहे. कोणी इतके कसे निष्ठुर आणि असंवेदनशी असू शकते?'' सतारीला असलेले वेष्टन फाडून तोडफोड झाली असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. 

- बुर्ज खलिफावर साजरा झाला 'किंग खान'चा आगळावेगळा वाढदिवस, व्हिडिओ पाहिलात का?

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातही शुभेंद्र राव यांना असाच अनुभव आला होता. ते दिल्लीहून सिडने येथे दुसऱ्या एका कंपनीच्या विमानातून जात असताना त्यांची सतार तुटली होती. 'हा प्रकार कधी थांबेल का? विमान कंपन्यांनी कलाकारांची वाद्ये तोडण्यास सुरवात केली तर, कलाकार कसे जगतील? आज काल प्रवास झाल्यावर लोक मला मी कसा आहे असे विचारत नाहीत, तर 'वाद्ये कशी आहेत?' असे विचारतात,' असा टोमणाही राव यांनी मारला. अशा प्रकारे नुकसान झालेल्या कलाकारांच्या हक्कांसाठी ऑनलाइन याचिकाही दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian classical musician criticized Air India for breaking his sitar on flight to New York