बुर्ज खलिफावर साजरा झाला 'किंग खान'चा आगळावेगळा वाढदिवस, व्हिडिओ पाहिलात का?

SRK-Burj-Khalifa
SRK-Burj-Khalifa

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा 54 वा वाढदिवस काल (ता.2) देशभरातच नव्हे, तर जगभरात साजरा करण्यात आला. शुक्रवारी रात्रीपासूनच शाहरुखच्या फॅन्सनी 'मन्नत' या बंगल्याबाहेर गर्दी केली होती. शाहरुखनेही मग वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या सगळ्या चाहत्यांना मध्यरात्री बंगल्याच्या गच्चीमध्ये येऊन अभिवादन केले आणि त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. 

शाहरुखच्या जगभरातील चाहत्यांनीदेखील त्याचा वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला. तसेच सोशल मीडियातून शुभेच्छांचा वर्षावही केला. जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या दुबईतही शाहरुखचा वाढदिवस हटक्या पद्धतीने साजरा करण्यात आला. जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफा या पूर्ण इमारतीवर शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा संदेश प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी दुबईतील त्याच्या फॅन्सनी मोठी गर्दी केली होती.

याचा एक व्हिडिओ स्वत: शाहरुखने आपल्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटवरून प्रसिद्ध केला असून यामध्ये दुबईचे राजे मोहम्मद अलबार आणि दुबईकरांचे आभार मानले आहेत. हा व्हिडिओ आणि या बुर्ज खलिफाचे फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहेत. 

दुसरीकडे नेटफ्लिक्स इंडियानेही त्याला शुभेच्छा देताना म्हटले आहे की, 'शाहरुखला या जगात पाठविण्यासाठी पूर्ण विश्वाला खूप धन्यवाद.'

जगातील सर्वात उंच इमारतीवरून अशा प्रकारे वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळणारा शाहरुख हा दुसरा भारतीय आणि एकमेव अभिनेता ठरला आहे. या अगोदर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपित्याला अभिवादन करण्यात आले होते. 

गेल्या काही महिन्यांपासून शाहरुख शूटिंगपासून दूर आहे. त्याने आतापर्यंत कोणताही नवा चित्रपट साइन केला नाही. ना आगामी चित्रपटाची घोषणा केली नाही. मात्र, त्याच्याबद्दल चाहत्यांच्या मनात असणारे प्रेम तसूभरही कमी झालेले नाही, हे त्याच्या वाढदिवसादिवशी दिसून आले. 

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com