भारतीयांनो लगेच इराण सोडा! युद्धविरामानंतर तेहरानमधील दुतावासाचा इशारा, हेल्पलाइन नंबर जारी

यापूर्वी ७ एप्रिलरोजीसुद्धा तेहरानमधील भारतीय दुतावासाकडून भारतीयांना इराण सोडण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्याचा पुढचा भाग म्हणून ही अॅडव्हायझरी जारी करण्यात आल्याचं दुतावासाकडून सांगण्यात आलं आहे.
Indian Embassy in Tehran

Indian Embassy in Tehran

esakal

Updated on

इराण अमेरिका यांच्यात युद्धविराम जाहीर करण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर आता इराण मधील भारतीय नागरिकांना तत्काळ देश सोडण्याचं, आवाहन तेहरानमधील दुतावासाकडून करण्यात आलं आहे. त्यासाठी त्यांनी हेल्पलाईन क्रमांकही जारी केले आहे.

इतकच नाही, तर भारतीय दुतावासाशी संपर्क केल्याशिवाय बॉर्डर परिसरात जाऊ नये, असंही दुतावासाकडून सांगण्यात आलं आहे. यापूर्वी ७ एप्रिलरोजीसुद्धा तेहरानमधील भारतीय दुतावासाकडून भारतीयांना इराण सोडण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्याचा पुढचा भाग म्हणून ही अॅडव्हायझरी जारी करण्यात आल्याचं दुतावासाकडून सांगण्यात आलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com