मैत्रीचे उदाहरण : रशियाच्या रॉकेटवर ‘तिरंगा’ कायम; मात्र...

Indian Flag remains on Russia's rocket
Indian Flag remains on Russia's rocketIndian Flag remains on Russia's rocket

रशियाने युक्रेवर हल्ला केल्याला आठवडा उलटला आहे. यामुळे जपान, अमेरिका, ब्रिटन आदी देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. याला उत्तर देत रशियाने त्यांच्या अंतराळ रॉकेटवरील युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम आणि जपानचे ध्वज झाकले आहेत. मात्र, भारतीय तिरंगा कायम (Indian Flag) ठेवला आहे. याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. भारताने मॉस्कोच्या कृतीबद्दल थेट टीका करणे टाळले आहे, हे विशेष... (Indian Flag remains on Russia's rocket)

रोसकॉसमॉसचे प्रमुख दिमित्री रोगोझिन यांनी ट्विटरवर (Tweet) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रशियाने कझाकस्तानमधील बायकोनूर कॉस्मोड्रोम येथे सोयुझ रॉकेटवरून यूएस, यूके आणि जपानचे ध्वज हटवताना दाखवले आहे. ‘काही देशांच्या ध्वजाशिवाय आमचे रॉकेट अधिक सुंदर दिसेल’, असे रशियन (Russia) अंतराळ संस्थेच्या प्रमुखाने ट्विट केले आहे.

Indian Flag remains on Russia's rocket
आरोग्यमंत्री राजेश टोपे ‘सर्वोत्कृष्ट भाषण’ पुरस्काराने सन्मानित

युक्रेनवर (ukraine) आक्रमण केल्याने ब्रिटनने गुरुवारी विमान वाहतूक आणि अंतराळ उद्योगातील रशियन कंपन्यांना ब्रिटिश विमा आणि पुनर्विमा सेवांमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी नवीन निर्बंध जाहीर केले. विमान वाहतूक किंवा अंतराळ उद्योगातील रशियन कंपन्यांना यूके-आधारित विमा किंवा पुनर्विमा सेवांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वापर करण्यापासून प्रतिबंधित केले जाईल, असे कोषागार कार्यालयाने निवेदनात म्हटले आहे.

पाश्चात्य सरकारांनी निर्बंध वाढवले

लंडन हे जगातील अग्रगण्य विमा बाजारपेठांपैकी एक आहे. त्यांनी रशियन कंपन्यांचा प्रवेश बंद करून गंभीर आर्थिक निर्बंध लागू करण्याची वचनबद्धता दर्शवित आहे, असे निवेदनात म्हटले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी गेल्या आठवड्यात युक्रेनमध्ये आपल्या सैन्याला पाठवण्याचे आदेश दिल्यापासून पाश्चात्य सरकारांनी रशियन व्यवसाय, बँका आणि अब्जाधीशांवर निर्बंध वाढवले ​​आहेत.

उच्च-सुरक्षा नेटवर्क वापरण्यास मनाई

शनिवारी युनायटेड स्टेट्स, युरोपियन युनियन, युनायटेड किंगडम आणि कॅनडा यांनी काही रशियन बँकांना SWIFT, २०० देशांमधील ११,००० वित्तीय संस्थांना जोडणारे उच्च-सुरक्षा नेटवर्क वापरण्यास मनाई केली होती. आठवड्याच्या शेवटी, युरोपियन युनियन, युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम, जपान, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया आणि तैवान यांनी २४ तासांमध्ये झालेल्या लष्करी घुसखोरीचा निषेध करीत नवीन आदेश जारी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com