आरोग्यमंत्री राजेश टोपे ‘सर्वोत्कृष्ट भाषण’ पुरस्काराने सन्मानित

Minister of Health Rajesh Tope Awarded the Best Speech Award
Minister of Health Rajesh Tope Awarded the Best Speech AwardMinister of Health Rajesh Tope Awarded the Best Speech Award

आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांना गुरुवारी (ता. ३) सर्वोत्कृष्ट भाषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१९-२० वर्षांसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. टोपेंना गुरुवारी या पुरस्कारासाठी सन्मानचिन्ह प्राप्त झाले. त्यांनी हा पुरस्कार घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांमुळे मिळाल्याचे सांगितले. (Minister of Health Rajesh Tope Awarded the Best Speech Award)

राष्ट्रकुल संसदीय मंडळ जागतिक स्तरावर संसद आणि विधानसभेच्या सर्व सदस्यांसाठी कार्यरत आहे. या संघटनेचे एक युनिट महाराष्ट्राच्या विधिमंडळातही कार्यरत आहे. मला या संस्थेतर्फे सर्वोत्कृष्ट भाषण पुरस्कार मिळाल्याने आजचा दिवस आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा व आनंदाचा क्षण असल्याचे राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले.

संस्थेच्या वतीने २०१६-१७ या वर्षासाठी सर्वोत्कृष्ट भाषण पुरस्काराने (Awarded the Best Speech Award) सन्मानित करण्यात आले होते. ६ जुलै २०२१ रोजी हा पुरस्कार जाहीर झाला होता. पुरस्काराचे सन्मानचिन्ह गुरुवारी प्राप्त झाले. यामुळे मी फार आनंदी आहे. हा पुरस्कार मी माझ्या घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना अर्पण करतो, असे ट्विट (tweet) राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com