
ब्रिटनमध्ये स्थलांतरीत नागरिकांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी सरकार हालचाली करत आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी नवं नागरिकत्व धोरण आणण्याची घोषणा केलीय. यामुळे ब्रिटनचं नागरिकत्व मिळवण्यासाठी स्थलांतरीतांना पाच ऐवजी आता दहा वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका भारतीय तरुणीने केलेल्या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.