
राज सिंग गिल यांनी 2022 ची निवडणूक सिटी कौन्सिलच्या प्रभाग 7 मधून मनप्रीत कौर यांच्या विरोधात लढवली होती. मात्र, कौर यांनी निवडणूक जिंकली.
Sikh Leader : भारतीय वंशाच्या शीख नेत्याला कॅलिफोर्नियात अटक; गुरुद्वारा जाळण्याचा रचला होता कट
अमेरिकेत (America) भारतीय वंशाच्या शीख नेत्याला (Sikh leader) अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर कॅलिफोर्नियातील (California) गुरुद्वार जाळण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. याशिवाय, त्याच्यावर गुरुद्वाराच्या सदस्याला मारण्यासाठी लोकांना पैसे दिल्याचाही आरोप आहे.
स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपी राज सिंग गिल (वय 60 ) हा बेकर्सफील्ड सिटी कौन्सिलसाठी (Bakersfield City Council) उमेदवार राहिला आहे. गुरुद्वारा शहीद बाबा दीप सिंगजी खालसा दरबारला लक्ष्य करून मालमत्ता जाळण्याचा कट रचल्याप्रकरणी त्याला नुकतीच अटक करण्यात आलीये.
अधिकाऱ्यांनी त्याच्याविरुध्द वॉरंट जारी केलं होतं. त्यानंतर त्याला गुन्हेगारी धमक्यासह सहा गुन्ह्यात अटक करण्यात आली. रिपोर्टनुसार, बेकर्सफील्ड पोलिस (Bakersfield Police) विभागानं सांगितलं की, राजनं गुरुद्वारा जाळण्यासाठी इतर लोकांना पैसे दिल्याचा आरोप आहे.
अहवालात म्हटलंय की, राज सिंग गिल यांनी 2022 ची निवडणूक सिटी कौन्सिलच्या प्रभाग 7 मधून मनप्रीत कौर यांच्या विरोधात लढवली होती. मात्र, कौर यांनी निवडणूक जिंकली. बेकर्सफील्ड सिटी कौन्सिलमध्ये निवडून आलेल्या कौर या पहिल्या शीख पंजाबी महिला होत्या.