सुदानमधील गॅस टँकरच्या स्फोटात भारतीय कामगारांचा मृत्यू; एकूण २३ ठार

वृत्तसेवा
Wednesday, 4 December 2019

सिरॅमिकच्या कारखान्यात एलपीजी गॅस टॅंकरचा स्फोट होऊन 23 जण ठार झाल्याची घटना सुदानमध्ये घडली. मृतात अनेक भारतीयांचा समावेश आहे, मात्र त्यांचा आकडा समजू शकला नाही. तसेच गॅस टॅंकर स्फोटात 130 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

खार्तुन : सिरॅमिकच्या कारखान्यात एलपीजी गॅस टॅंकरचा स्फोट होऊन 23 जण ठार झाल्याची घटना सुदानमध्ये घडली. मृतात अनेक भारतीयांचा समावेश आहे, मात्र त्यांचा आकडा समजू शकला नाही. तसेच गॅस टॅंकर स्फोटात 130 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप 

सुदानमधील भारतीय दुतावासाने हा स्फोट मंगळवारी झाल्याचे सांगून त्यात अनेक भारतीय कामगार मृत्युमुखी पडल्याचे सांगितले. मात्र, त्याचा आकडा उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे. दुतावासाने संकेतस्थळावर म्हटले, की आतापर्यंत मिळालेल्या अहवालानुसार या घटनेत भारतीय कामगारासह अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक कामगार जखमीही झाले आहेत. या कारखान्यात 50 हून अधिक भारतीय कामगार करत असल्याचे दुतावासाने सांगितले.

काय घडलं बैठकीत? ज्यानंतर अजित पवारांनी केलं बंड

सुदान सरकारने या घटनेत 23 जण ठार तर 130 हून अधिक जखमी झाल्याचे म्हटले आहे. प्राथमिक चौकशीत घटनास्थळी सुरक्षा बाळगण्याबाबत कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसल्याचे निष्पन्न झाल्याचे म्हटले आहे. ज्वलनशील पदार्थाचा बेकायदा रीतीने साठा केल्याने आग पसरल्याचे सरकारने म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indians among 23 killed in factory fire in Sudan

Tags
टॉपिकस
Topic Tags: