
भारताच्या लष्कराने 26 फेब्रुवारीला नियंत्रण रेषेपलिकडे जाऊन पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केला होता. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या प्रशिक्षण तळांना उद्ध्वस्त केलं होतं. याबाबत आता मोठा खुलासा झाला आहे.
श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या लष्कराने 26 फेब्रुवारीला नियंत्रण रेषेपलिकडे जाऊन पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केला होता. बालाकोटमधील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या प्रशिक्षण तळांना उद्ध्वस्त केलं होतं. याबाबत आता मोठा खुलासा झाला आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानचे माजी राजनैतिक अधिकारी आगा हिलाली यांनी एअर स्ट्राइकमध्ये जवळपास 300 दहशतवादी मारले गेले होते असं एका टीव्ही शोमध्ये मान्य केलं आहे.
पाकिस्तानचे माजी राजनैतिक अधिकारी आगा हिलाली यांनी म्हटलं की, भारताने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून युद्धासारखंच काम केलं. यामध्ये कमीत कमी 300 दहशतवादी ठार झाले होते. आमचं लक्ष्य त्यांच्यापेक्षा वेगळं होतं. आम्ही त्यांच्या मोठ्या अधिकाऱ्यांना टार्गेट केलं. आमच्याकडून उचललेलं पाऊल हे योग्य होतं कारण ती लष्कराची माणसं होतीत. आम्ही त्यावेळी म्हटलं होतं की, या कारवाईत काहीही जिवीतहानी झालेली नाही. आता आम्ही त्यांना सांगितलं आहे की तुम्ही जे कराल त्याला फक्त उत्तर देऊ.
हे वाचा - फ्रान्सची भारताला मोठी ऑफर ! राफेल, पँथर हेलिकॉप्टर्ससाठी लवकरच महत्त्वाचा निर्णय
हिलाली हे पाकिस्तानी उर्दू चॅनेलवर एका कार्यक्रमात बोलत होते. माजी राजनैतिक अधिकाऱ्याचं हे वक्तव्य पाकिस्तान मुस्लिम लीग नवाजचे नेते अयाज सादिक यांच्या प्रतिक्रियेनंतर समोर आलं. याआधी भारताकडून करण्यात आलेला एअर स्ट्राइक सातत्याने पाकिस्तानने झाला नसल्याचंच म्हटलं होतं. तसचं काहीच नुकसान झालं नसल्याचंही इम्रान खान यांच्या सरकारने म्हटलं होतं.