
इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. हे विमान संयुक्त अरब अमिरातीतील शारजाहहून लखनऊला येत होते.
कराची : विमान प्रवासादरम्यान अनेकदा अशा काही घटना घडतात, ज्यामुळं विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागतं. अशीच एक घटना घडली असून भारतीय विमानाचं पाकिस्तानमध्ये इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. इंडिगो एअरलाईन्सच्या ६ई १४१२ या विमानातील एका प्रवाशाची प्रकृती अचानक बिघडली त्यामुळे पायलटला विमान पाकिस्तानमध्ये उतरवावे लागले. प्रसंगावधान साधत पायलटने पाकिस्तान एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संवाद साधत त्यांची परवानगी मिळवली. विमान प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला होता, पायलट आणि विमानातील कर्मचाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण दुर्दैवाने या प्रवाशाचा मृत्यू झाला.
मोदींच्या कौतुकानंतर काँग्रेस कार्यकर्ते भडकले; गुलाम नबी आझाद यांचा पुतळा जाळला
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याच्या मार्गावर आहेत. भारतीय विमानाच्या पायलटने मदत मागताच पाकिस्तान एअर ट्रॅफिक कंट्रोलने हिरवा कंदील देत मदतीचा हात पुढे केला. इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. हे विमान संयुक्त अरब अमिरातीतील शारजाहहून लखनऊला येत होते. एका प्रवाशाची प्रकृती बिघडल्याची माहिती समजताच पायलटने विमानाचं लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचे कराची विमानतळ सर्वात जवळ असल्याने त्याने याच विमानतळावर उतरवले, पण त्याआधीच प्रवाशाचा मृत्यू झाला होता.
बाबोव! चहाच्या एका कपाची किंमत 1000 रूपये, जाणून घ्या इतका महाग का?
आपत्कालीन वेळेत (इमर्जन्सी लँडिंग) विमानाचं लँडिंग करायचं असेल तर त्यासाठी विमान ज्या भागातून जात आहे, त्या भागातील एअर ट्रॅफिक कंट्रोलशी चर्चा करून परवानगी घ्यावी लागते. इंडिगो विमानाच्या पायलटनेही हेच केले आणि कराचीच्या जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याने इमर्जन्सी लँडिंग केले. विमानतळावरील वैद्यकीय पथकाने या प्रवाशाला मृत घोषित केले, अशी माहिती इंडिगो प्रशासनाने दिली आहे.
तत्पूर्वी, मागील वर्षीही कराची विमानतळावर एका विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं होतं. रियाधवरून दिल्लीसाठी झेपावलेल्या गो-एअरच्या विमानाचे मेडिकल इमर्जन्सीमुळेच पाकिस्तानात लँडिंग करण्यात आले होते.
- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)