esakal | श्रीरामाची पूजा करणारे मुस्लिम राष्ट्र 
sakal

बोलून बातमी शोधा

ramayana

सुमारे 98 टक्के मुस्लिम समुदाय असलेल्या या देशात रामायण सर्वप्रिय लोकनाट्य असून त्याचे आजही प्रयोग होत आहे. तेथील लोक मुस्लिम असले तरी स्वतःला रामाचे वंशज समजतात.

श्रीरामाची पूजा करणारे मुस्लिम राष्ट्र 

sakal_logo
By
सम्राट कदम

जकार्ता : जगाच्या पाठीवर असाही एक मुस्लिम देश आहे जो श्रीरामचंद्रांना राष्ट्रपुरुष मानतो. 'रामलीला' हे त्या देशाचे प्रमुख लोकनाट्य आहे. तिथल्या चौकाचौकात आणि सार्वजनिक ठिकाणी आपल्याला राम, कृष्ण, अर्जुन आदींच्या मुर्त्या पाहायला मिळतील. स्वतःला बालीची नगरी समजणारा हा देश म्हणजे 'इंडोनेशिया' !!

सुमारे 98 टक्के मुस्लिम समुदाय असलेल्या या देशात रामायण सर्वप्रिय लोकनाट्य असून त्याचे आजही प्रयोग होत आहे. तेथील लोक मुस्लिम असले तरी स्वतःला रामाचे वंशज समजतात. पाचव्या शतकांमध्ये हिंदू धर्माचा तेथे प्रचार प्रसार झाल्याचे सांगण्यात येते.

राजा मजापहित याने १३व्या शतकामध्ये रामायणाची ही परंपरा सुरु केल्याची नोंद आहे. इंडोनेशियातील बाली, जाकार्ता, जावा आदी शहरांमध्ये रामायण आणि रामलीला विशेष लोकप्रिय आहे. परंतु भारतातील रामायणापेक्षा हे रामायण जरा वेगळे आहे. भारतात वाल्मीकि रामायण सांगितले जाते. इंडोनेशियामध्ये 'काकाविन' नावाचे रामायण सांगितलं जाते. 'कावी' भाषेत असलेलं हे रामायण नवव्या शतकात योगीश्वर यांनी राचल्याच इतिहास सांगतो .

हे वाचा - अयोध्येच्या राजकुमारीचं झालं होतं कोरियाचा राजा किम सुरोशी लग्न

1961 पासून इंडियन इंडोनेशियामध्ये अखंड 'रामलीला' चालू आहे. त्याचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. रामायणामध्ये राजा जनक यांचे पात्र करणारे अली नूर म्हणतात,"मी जरी मुस्लिम असलो तरी माझी परंपरा रामाची आहे. मी चांगला माणूस असल्यामुळे मी हे पात्र करतो.

जंबुद्वीपाचा रहिवासी असल्यामुळे राम माझ्या हृदया जवळ आहे." इंडोनेशियाच्या 'योग्यकर्ता' शहरात दहाव्या शतकातील प्राचीन राम मंदिराजवळ ही रामलीला सादर करण्यासाठी अली नूर आले होते. मागील कित्येक वर्षांपासून ते रामलीलेत राजा जनकाच पात्र करत आहे.

हे वाचा - राम मंदिर दिसणार कसं? ट्रस्टने प्रसिद्ध केले 8 फोटो

इंडोनेशियाच विमानतळ, सार्वजनिक चौक आणि सार्वजनिक ठिकाणी आपल्याला राम, कृष्ण, अर्जुन, सीता या रामायण-महाभारतातील देवाधिकांच्या मुर्त्या पाहायला मिळतील. रामाला राष्ट्रपुरुष मानणारा हा मुस्लिम देश आपल्याला बरेच काही शिकवत आहे.