
Physical Relation Ban: या देशात लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवण्यास बंदी; पर्यटक भडकले कारण...
Indonesia Law: कोरोना महामारीनंतर जेथे इंडोनेशिया पर्यटन उद्योगामध्ये स्वत:ला प्रबळ करू पाहात होता तेथे त्याच्या एका नियमाने या देशाला गोत्यात टाकले आहे. इंडोनेशियाच्या संसदेने अविवाहित जोडप्यांनी शारीरिक संबंध ठेवणे अपराध असल्याचे घोषित केले आहे. तसेच हा नियम इंडोनेशियाच्या नाररिकांसह देशात येणाऱ्या पर्यटकांसाठीही बंधनकारक करण्यात आलाय. त्यामुळे पर्यटकांचा चांगलाच भडका उडाला. यामुळे इंडोनेशियाची इकॉनॉमीही हालण्याची शक्यता आहे.
इंडोनेशियाच्या संसंदेत मंगळवारी या नियमाला मंजुरी दिली गेली. नव्या नियमाअंतर्गत लग्नाआधी सेक्स करणे अपराध असल्याचे सांगितले गेले आहे. याशिवाय लग्नानंतर पार्टनरव्यतिरीक्त कोणाशी सेक्स करण्यासही बंदी घोषित करण्यात आली आहे. या प्रकरणात कारवाई मात्र तेव्हाच करण्यात येईल जेव्हा नियम तोडणाऱ्यांचे आई-वडील, पती-पत्नी किंवा मुले याबाबात तक्रार करतील.
पर्यटनातून मोठी रक्कम कमावतो इंडोनेशिया
इंडोनेशिया देश त्यांच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. 2021 च्या वर्ल्ड इकोनॉमी फोरममने मे 2022 मध्ये जारी केलेल्या डेटानुसार, इंडोनेशियाने ग्लोबल ट्यूरिझम इंडेक्समध्ये 32 वा क्रमांक आहे. येथे पर्यटन हा फक्त मिळकतीचा नाही तर रोजगाराचाही महत्वाचा स्त्रोत आहे.