
International Tigers Day : जगाच्या तुलनेत 75% वाघ भारतामध्ये आहेत, हे कसं घडलं ?
वाघाचं संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या प्रजातीला जपण्यासाठी जागतिक स्तरावर 29 जुलै हा जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो. व्याघ्र दिन सुरूवात ही रशियामधून झाली आहे. सेंट पीटर्सबर्ग टाइगर समीट यांनी 2010 साली हा दिवस साजरा करण्याची संकल्पना मांडली होती.तेव्हापासून मग व्याघ्र दिन साजरा होऊ लागला.
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवसाचे महत्त्व काय आहे ?
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन हा दरवर्षी “त्यांचे अस्तित्व आमच्या हातात आहे” या घोषणेने किंवा थीमने साजरा केला जातो. वाघाची घटती संख्या आणि जगभरात वाघांचे संवर्धन करणे हे या दिवसाचे मुख्य उद्दीष्ट आहे.जागतिक वन्यजीव निधी (WWF) च्या मते जागतिक पातळीवर फक्त 3900 एवढेचं वाघ शिल्लक आहेत. अस सांगितल जातं की 20 व्या शतकाच्या सुरूवातीपासूनच वाघांची संख्या हळूहळू कमी होण्यास सुरुवात झाली आहे. आजपासून शंभरवर्षांपुर्वी वाघांच्या संख्येचा आकडा हा जवळपास 1 लाखाच्या आसपास होता.
वाघांची शिकार होण्यामागची कारणे कोणती ?
1)असंख्य कारणांमुळे वाघांची शिकार होते जसे की आजही चीनमध्ये पारंपरिक औषधी तयार करण्यासाठी वाघांच्या कातडी तसेच हाडांचा वापर होतो.तसेच बहुतांश ठिकाणी वाघ नखांसाठी वाघांची शिकार केली जाते. थोडक्यात काय तर वाघाच्या शरीरातील प्रत्येक भागाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.त्यामुळे वाघाच्या शिकारीचेप्रमाणात वाढले आहे.
2) शेती, जमीन, लाकूड यासाठी मानवाने जंगलाच्या मोठे पट्टातील झाडे तोडून तिथे राहण्याची जागा तयार केली आहे. याच गोष्टीमुळे वाघांच्या नैसर्गिक अधिवासात 93% तोटा झाला आहे आणि त्यामुळे त्यांची जगण्याची शक्यता कमी झाली आहे.
3) हवामान बदल हे देखील वाघांची संख्या कमी होण्याच मुख्य कारण आहे. वाघांच हब असलेल्या सुंदरबनची वाढती समुद्राची पातळी नष्ट होत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम हा वाघांच्या आरोग्यवर होत आहे.
प्रोजेक्ट टायगरची सुरूवात कधी झाली होती ?
देशातील वाघांच्या संवर्धनासाठी कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पातून 1 एप्रिल 1973 रोजी प्रोजेक्ट टायगर सुरू करण्यात आला, जो आजही कार्यरत आहे. येथे 500 हून अधिक प्रजातींचे पक्षी, 110 प्रकारची झाडे, सुमारे 200 प्रजातींची फुलपाखरे, 1200 हून अधिक हत्ती, नद्या इत्यादी कॉर्बेटला मनोरंजक बनवतात. देश-विदेशातील पर्यटक दरवर्षी कॉर्बेट पार्कला पोहोचतात. एका अहवालानुसार देशातील केरळ, कर्नाटक, उत्तराखंड, बिहार आणि मध्य प्रदेशात वाघांची संख्या झपाट्याने वाढत आहे. एक काळ असा होता की देशात वाघांची संख्या झपाट्याने कमी होत होती. परंतु आज देशातील सर्व व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या झपाट्याने वाढत आहे. उत्तराखंडच्या जगप्रसिद्ध जिम कॉर्बेट नॅशनल पार्कने यामध्ये एक विक्रम केला आहे.
आजच्या घडीला भारतात किती वाघ आहेत ?
भारतातील वाघांची संख्या 2967 एवढी आहे. भारतात जगाच्या तुलनेत 75% वाघ असल्याच ट्विट नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. सध्याच्या परिस्थितीत प्रकल्प टायगर अंतर्गत नियोजित प्रयत्नांमुळे जगातील सर्वाधिक वाघ भारतात आहेत. वाघांच्या जगभरात अनेक प्रजाती आहेत. त्यामध्ये सायबेरियन वाघ, बंगाल टायगर, इंडोचायनीज वाघ, मलायन वाघ, दक्षिण चीन वाघ आदींचा समावेश आहे. भारतामध्ये प्रामुख्याने बंगाल टायगर आढळतो. भारतासोबतच या प्रजातीचा वाघ बांग्लादेश, भूतान, नेपाळ, चीन, म्यानमार मध्ये आढळतात. भारत सरकारच्या माहितीनुसार, 2019 पर्यंत देशात वाघांची संख्या 2967 होती. टायगर एस्टिमेशन रिपोर्टनुसार, 2014 मध्ये भारतातील वाघांचा आकदा 2226 होता. 2018 मध्ये तो वाढून 2967 झाला आहे.