
इराण आणि इस्रायल यांच्यातलं युद्ध अखेर १२ दिवसांनंतर थांबलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी युद्धबंदी झाल्याची घोषणा केली होती. मात्र इराणने अजूनही एकमत झालं नाहीय असं सांगत हल्ला केला होता. पण शेवटी इराणने मंगळवारी सरकारी टेलिव्हिजन चॅनेलवरून शस्त्रसंधी लागू केल्याची घोषणा केली. इराणच्या सरकारी टीव्हीने मंगळवारी सांगितलं की, इस्रायलसोबत शस्त्रसंधी झाली आहे. इस्रायलनेसुद्धा हल्ल्याबाबत अलर्ट हटवला असून लोकांना बंकरमधून बाहेर येण्याची परवानगी मिळाली आहे.