esakal | इराणचा भारताला मोठा झटका; घेतला 'हा' निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

Iran drops India from Chabahar rail project cites funding delay

इराणने भारताला मोठा झटका दिला असून एका प्रकल्पातून इराणने भारताला बाहेर काढलं असून आता हा प्रकल्प इराणने स्वत:च पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. चाबहार ते जाहेदानपर्यंत रेल्वे मार्ग उभारण्यासाठी करार करण्यात आल्यानंतर चार वर्षांनी इराणने भारताला या प्रकल्पातून बाहेर काढलं आहे.

इराणचा भारताला मोठा झटका; घेतला 'हा' निर्णय

sakal_logo
By
वृत्तसंस्था

तेहराण : इराणने भारताला मोठा झटका दिला असून एका प्रकल्पातून इराणने भारताला बाहेर काढलं असून आता हा प्रकल्प इराणने स्वत:च पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. चाबहार ते जाहेदानपर्यंत रेल्वे मार्ग उभारण्यासाठी करार करण्यात आल्यानंतर चार वर्षांनी इराणने भारताला या प्रकल्पातून बाहेर काढलं आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

गेल्या आठवड्यात इराणचे वाहतूक आणि शहर विकास मंत्री मोहम्मद इस्लामी यांच्या हस्ते ६२८ किमी लांबीच्या चाबहार-जाहेदान रेल्वे मार्ग प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं असून कामास सुरुवात करण्यात आली आहे. हा संपूर्ण प्रकल्प मार्च २००२ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचं इराणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. इराण रेल्वे विभाग भारताच्या कोणत्याही मदतीविना हा प्रकल्प पूर्ण करणार असून यासाठी राष्ट्रीय विकास निधीची वापर करण्यात येणार असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
--------------
सचिन पायलट यांच्यासोबत किती आमदार? थेट व्हिडिओ प्रसिद्ध करत दिले उत्तर
--------------
अनेक देशांची चुकीच्या मार्गाने वाटचाल; जागतिक आरोग्य संघटना
--------------
यामधील महत्त्वाची घडामोड म्हणजे चीनने इराणसोबत ४० अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीसाठी करार केला असतानाच हे वृत्त आलं. चीनने पुढील २५ वर्षांसाठी इराणसोबत करार केला आहे. इराण रेल्वे आणि इंडियन रेल्वेज कन्स्ट्रक्शन लिमिटेड यांच्यात या रेल्वे प्रकल्पावरुन चर्चा सुरु होती. हा प्रकल्प भारताच्या अफगाणिस्तान आणि दक्षिण आशियात पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यासाठी असणाऱ्या कटिबद्धतेचा तसंच इराण आणि अफगाणिस्तानसोबत असणाऱ्या त्रिपक्षीय कराराचा भाग होता. मे २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी तेहरानच्या दौऱ्यावर होते. यावेळी तेहरानमध्ये इराणचे अध्यक्ष रुहाणी, अफगाणिस्तानचे अध्यक्ष घणी आणि आयआरसीओएन यांच्यात चाबहार रेल्वे मार्गाच्या करारावर स्वाक्षरी केली होती.

कुठे होणार होता हा प्रकल्प?
अफगाणिस्तान सीमारेषेलगत हा रेल्वे मार्ग उभारला जाणार होता. हा रेल्वे मार्ग अफगाणिस्तानच्या जारांजपर्यंत जाणार आहे. ६२८ किमी लांबीचा हा प्रकल्प आहे.

कारण काय?
भारताकडून हा प्रकल्प सुरु करण्यासाठी तसंच निधी मिळण्यास विलंब होत असल्याचं कारण पुढे करत इराण सरकारने हा प्रकल्प भारताकडून काढून घेतला आहे. आता तो प्रकल्प स्वतःच पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.