

Iran-Israel Conflict
esakal
युद्ध संपवण्यासाठी अमेरिका इराणबरोबर चर्चा करत आहे, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करत असले, तरीही इराणकडून इस्राईल आणि आखाती देशांना लक्ष्य करणे सुरूच ठेवले आहे. इराणने डागलेले एक क्षेपणास्त्र इस्राईलची राजधानी तेल अविवच्या मध्य भागामध्ये कोसळले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली.