Iraq : इराकमधील राष्ट्रपती निवडणूक अनिश्चित काळासाठी स्थगित

इराकमध्ये चार महिन्यांपूर्वी सार्वजनिक निवडणुका झाल्या होत्या.
Iraq Presidential Election News
Iraq Presidential Election Newsesakal

नवी दिल्ली : प्रमुख राजकीय पक्षांनी अधिवेशनावर बहिष्कार टाकल्यानंतर इराकच्या संसदेने सोमवारी (ता.सात) देशाच्या राष्ट्रपतीपदासाठी होणारी निवडणूक अनिश्चितकाळासाठी स्थगित केली आहे. इराकमध्ये राष्ट्रपती निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होणार होते. मात्र संसदेत प्रतिनिधित्व करणारे राजकीय पक्षांनी अधिवेशनावर बहिष्कार टाकला आणि मतदान अनिश्चितकाळासाठी स्थगित केले. इराकमध्ये चार महिन्यांपूर्वी सार्वजनिक निवडणुका झाल्या होत्या. तेव्हापासून नवीन पंतप्रधानांची नियुक्ती झालेली नाही. देशाच्या राष्ट्रपती निवडणूक संसदेत सोमवारी दुपारी मतदान होणार होते. (Iraq Presidential Election Postponed For Indefinite Time)

Iraq Presidential Election News
ट्रक चालकांच्या आंदोलनामुळे कॅनडाच्या राजधानीत आणीबाणीची घोषणा

सध्या इराकी कुर्द समुदायाचे सदस्य बरहम सलीह जवळ राष्ट्रपतीपद आहे. विविध संसदीय गट आणि राजकीय पक्षांचे अधिवेशनावर बहिष्कार टाकण्याच्या आवाहनामुळे इराकमध्ये राजकीय संकट उभे राहिले आहे. बगदादच्या (Baghdada) तगड्या सुरक्षा असलेल्या हरित क्षेत्रात ३२९ सदस्यसंख्या असलेल्या संसदेत या पदाच्या निवडणुकीसाठी आवश्यक दोन तृतीयांश बहुमत असण्याची शक्यता नाही. सोमवारी दुपारी संसद भवनात काही सदस्यांना जोर लावला. नाव न सांगण्याच्या अटीवर एका सरकारी अधिकाऱ्याने एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितले, की राष्ट्रपती निवडणुकीसाठी कोणतेही मतदान होणार नाही. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये इराकच्या संसदीय निवडणुकीत मतदान खूपच कमी झाले होते. या व्यतिरिक्त निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यासाठी काही महिने गेले. राजकीय गटांमध्ये गंभीर संवादा व्यतिरिक्त संसदेत बहुमत असणारी युती बनवणे शक्य झाले नाही. आणि पंतप्रधान मुस्तफा अल-कदीमी यांच्या जागी नवीन पंतप्रधान निवडला गेला नाही. (Global News)

Iraq Presidential Election News
कोरोना काळात कुणी काय केलं, चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडीला सवाल

इराकमध्ये (Iraq) १० ऑक्टोबर २०२१ मध्ये पाचवे संसदीय निवडणुका झाल्या. यात शिया मुस्लिम धर्मगुरु मुक्तादा अल-सद्रचे सदर आंदोलन ३२९ जागांपैकी ७३ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. इराकच्या संविधानानुसार खासदारांना दोन तृतीयांश बहुमताने उमेदवारांपैकी एकाला नवीन इराकचे राष्ट्रपती म्हणून निवडावे लागते. त्यांचा कार्यकाळ चार वर्षापर्यंत असेल. नवीन राष्ट्रपती सर्वात मोठ्या पक्षाला तीस दिवसांच्या आत सरकार बनवण्यासाठी पंतप्रधानाचे नाव निश्चित करायला सांगतील. इराकच्या राष्ट्रपती निवडणुकीत होणाऱ्या विलंबामुळे राजकीय संकट आणखीन वाढु शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com