मोदींना जमलं ते त्यांच्या मित्राला जमणार का? सत्ता मिळेल पण बहुमताचं काय?

Netanyahu_Modi
Netanyahu_Modi

Israel Elections 2021: जेरुसलेम : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची मैत्री जगजाहीर आहे. नेतान्याहू यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजयाचा दावा केला आहे. दोन वर्षात चौथ्यांदा ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. नेतान्याहू यांनी विजयाचा दावा केला असला तरी त्यांना बहुमत मिळेल का? याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. 

नेतान्याहू पुन्हा एकदा बहुमतापासून दूर राहू शकतात, अशीच चर्चा सध्या सुरू आहे. त्यांनी इस्रायलचे पंतप्रधानपद अनेक वर्षांपासून भूषवले आहे.  २०१९नंतर झालेल्या ३ निवडणुकांमध्ये त्यांना दक्षिणपंथी आघाडीचा पाठिंबा मिळालेला नव्हता. त्यामुळे मंगळवारी पार पडलेल्या मतदानप्रक्रियेत दक्षिणपंथी आघाडीला ते एकत्र करण्यात यशस्वी होतात का हे येणारा काळच ठरवणार आहे.

इस्रायलची लोकसंख्या जवळपास ९० लाखांच्या घरात आहे. त्यापैकी अर्ध्याहून अधिकांना आतापर्यंत कोरोनाची लस देण्यात आली आहे. याचाच आधार त्यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी केला आहे. 

इस्रायलमधील प्रमुख तीन प्रसारकांनी एक्झिट पोलचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार १२० सदस्यांच्या संसदेत 'द नेसेट' मध्ये नेतान्याहूंच्या लिकूड यांना सर्वाधिक जागा जिंकता येतील. या आठवड्याच्या शेवटी येणारे अंदाज जर एक्झिट पोलनुसार आले तर लिकूड ३०-३१ जागांवर विजय मिळवतील. यामध्ये लिकूड यांच्या धार्मिक सहयोगींचा समावेश केला तर नेतान्याहू यांना जवळपास ५० हून अधिक जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, दक्षिणपंथी आघाडीचा विजय हा नेतान्याहूंचे माजी सहयोगी नफ्ताली बेनेट यांच्याशी होणाऱ्या तडजोडीवर ठरणार आहे. बेनेट हे एकमेव व्यक्ती आहेत, ज्यांनी नेतान्याहूंच्या विरोधी गटात जाण्यास नकार दिला होता. 

नेतान्याहू यांनी मंगळवारी लिकूड आणि दक्षिणपंथाच्या बाजूने मोठ्या विजयाची अपेक्षा व्यक्त केली आहे. आपल्या सिद्धांतांना मानणाऱ्या आणि तत्वांचे अनुसरण करणाऱ्या प्रतिनिधींशी मी संवाद साधणार आहे, तसेच सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणार आहे, असं आश्वासन नेतान्याहू यांनी समर्थकांशी संवाद साधताना दिलं. 

- जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com