Israel-Hamas war: इस्त्राईलमधील अति उजवे सरकार बदला; अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांचा सल्ला

Joe Biden: गाझातील हत्यांबद्दल तीव्र नाराजी
joe biden
joe bidensakal

गाझा पट्टीतील अंदाधुंद बॉम्बहल्ल्यांमुळे इस्राईल आंतरराष्ट्रीय समर्थन गमावत आहे, असे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना मी सांगितले आहे. तसेच अति उजव्या पक्षांचे वर्चस्व असलेले त्यांचे सरकार बदलावे, असा सल्ला दिल्याचेही अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन म्हणाले. गाझातील नागरिकांच्या हजारो हत्येबद्दल अमेरिकेने इस्त्राईलवर प्रथमच नाराजी व्यक्त केली आहे.

joe biden
Israel-Hamas war : ''दहशतवादी रुग्णालयात लपलेले असल्याने तिथेही हल्ले करावे लागले'', इस्राईलकडून कबुली

गाझामध्ये शस्त्रसंधी करावी, अशी मागणी आंतरराष्ट्रीय पातळीवर होत आहे. अमेरिकेने मात्र त्याला ठाम विरोध करून इस्त्राईलला लष्करी मदतीचा हात पुढे केला असला तरी पॅलेस्टिनी नागरिकांच्या बचावासाठी अधिक उपाययोजना करण्याचे आवाहन बायडेन यांच्या प्रशासनाने इस्त्राईलला वारंवार केले आहे. पण त्यानंतरही इस्त्राईलकडून हल्ले सुरूच आहेत. त्यांच्या युद्धकाळातील मंत्रिमंडळात दोन निवृत्त सैन्य अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या युद्धाला इस्त्राईलमधील राजकारण्यांप्रमाणेच नागरिकांचेही समर्थन मिळत आहे.

joe biden
Israel-Hamas War: आता हमासने इस्राइलसमोर ठेवली नवी अट, 'सर्व पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करा अन्यथा...'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com