अखेर इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्ष थांबला; अमेरिकेच्या दबावानंतर युद्धविराम? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Israel-Hamas

इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्ष अखेर 11 दिवसांनी थांबला

जेरुसलेम - इस्रायल (israel) आणि हमास (Hamas) यांच्यात 11 दिवसांपासून सुरु असलेला संघर्ष अखेर थांबला आहे. युद्धबंदीसाठी दोघांचे एकमत झाले आहे. गेल्या 11 दिवसांपासून गाझा पट्टीत (Gaza) या संघर्षामुळे मोठ्या प्रमाणाव वित्त आणि जिवितहानी सुरु होती. इस्रायलमधील दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले होते. 200 हून अधिक लोक यात मृत्यूमुखी पडले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netnyahu) यांच्या संरक्षण मंत्रिमंडळाने गाझापट्टीतील लष्करी कारवाई थांबवण्यासाठी मंजुरी दिली. दरम्यान, हा संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेकडून दबाव टाकण्यात आल्याचंही म्हटलं जात आहे. israel-palestine-hamas-agree-cease fire after-11-day-war

युद्धबंदीच्या घोषणेबाबत नेतन्याहू यांच्या कार्यालयाने सांगितलं की, त्यांच्या संरक्षण मंत्रालयाने इस्रायलचे लष्करप्रमुख आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिफारसीनंतर युद्धबंदीचा प्रस्ताव स्वीकारला आहे. कारवाईमध्ये मोठं यश मिळालं असून ते अभूतपूर्व असं आहे. राजकीय नेत्यांनी असंही स्पष्ट केलं की ग्राउंड लेव्हलचे वास्तव पुढच्या कारवाईची दिशा ठरवेल. इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाचे हे वक्तव्य हमाससाठी धमकी असल्यासारखंच आहे.

इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षात कमीत कमी 230 पॅलेस्टाइन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 65 मुलं आणि 39 महिलांचा समावेश आहे. तर 17 हून अधिक जण जखमी झाले आहेत. दुसऱ्या बाजुला इस्रायलमध्ये लहान मुलांसह 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा: संघर्ष आणि आपत्तींमुळे विस्थापितांच्या संख्येत वाढ

दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटलं आहे. बायडेन यांनी युद्धविराम केल्याबद्दल इस्रायलचं कौतुक केलं आहे. त्यांनी म्हटलं की, अमेरिकेनं दहशतवादी संघटनांकडून स्वत:ला वाचवण्यासाठी इस्रायलचं समर्थन केलं. मला वाटतं की आपल्याकडे पुढे जाण्यासाठी एक संधी आहे आणि मी हे काम करण्यासाठी कटिबद्ध आहे.

loading image
go to top