Israel Attacks : पवित्र रमजान महिन्यात इस्राईलचे हल्ले सुरूच, मृतांमध्ये महिला आणि बालकांचे प्रमाण दोन तृतीयांश

मृतांमध्ये महिला आणि बालकांचे प्रमाण दोन तृतीयांश
Israeli Attacks
Israeli Attacks esakal

राफा : मुस्लिमधर्मीयांसाठी पवित्र असलेल्या रमजानच्या महिन्यात इस्राईलचे हल्ले थांबतील, ही अंधूक आशाही पूर्णपणे फोल ठरली असून गाझा पट्टीत मागील चोवीस तासांमध्ये विविध ठिकाणी झालेल्या हल्ल्यांमध्ये किमान ६७ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे युद्धात मृत्युमुखी पडलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांची संख्या ३१ हजार ११२ वर गेली आहे. मृतांमध्ये महिला आणि बालकांचे प्रमाण दोन तृतीयांश आहे.

Israeli Attacks
Kitchen Tips : किचनमधील या वस्तू कधीच फेकून देऊ नका, कारण...

हमासच्या ताब्यातील काही अपहृतांवर लैंगिक अत्याचार झाल्याचा इस्राईलचा आरोप आहे. मात्र, यामुळे इस्राईलने पॅलेस्टिनी नागरिकांवर अविरत हल्ले करावेत, असा होत नसल्याचा इशारा अमेरिकेने दिला आहे. मात्र, तरीही इस्राईलकडून हल्ल्यांची कारवाई थांबविण्यात आलेली नाही. इस्राईलने मागील चोवीस तासांमध्ये दक्षिण गाझामधील खान युनिस, राफा आणि इतर काही गावांवर हल्ले केले. या हल्ल्यात किमान ६७ जणांचा मृत्यू झाल्याचे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले. इस्राईलने आज हिज्बुल्ला या संघटनेलाही लक्ष्य करताना लेबनॉनमधील बालबेक शहरावर हल्ले केले. या हल्ल्यांत सहा जण जखमी झाले.

Israeli Attacks
Hair Care Tips : कोंड्याची समस्या कमी करण्यासाठी लिंबाच्या सालींचा अशा प्रकारे वापर करा, जाणून घ्या

जहाजाद्वारे मदत पाठविली

गाझा पट्टीतील नागरिकांना मदतसाहित्य पोहोचविण्याचा नवा मार्ग निश्‍चित करण्याच्या दृष्टीने अन्नधान्याने भरलेले जहाज गाझा पट्टीच्या दिशेने पाठविण्यात आले. प्रसिद्ध शेफ जोस आंद्रेस यांच्या ‘वर्ल्ड फूड किचन’ या संस्थेने सुमारे दोनशे टन अन्नधान्य गोळा करून ते गाझाच्या दिशेने पाठविले आहे. हे जहाज गाझाच्या किनारपट्टीवर पोहोचण्यास किमान तीन दिवस लागणार आहेत. अमेरिकेनेही जहाजाद्वारे मदत पाठविण्याची घोषणा केली आहे.

नेतान्याहू-दोवाल यांच्यात चर्चा

जेरूसलेम : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी आज इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची भेट घेत गाझा पट्टीत तातडीने मदत पुरविण्याच्या मुद्द्यावर चर्चा केली. गाझा पट्टीत अन्नाची प्रचंड कमतरता असून हा प्रश्‍न प्राधान्याने सोडविण्याची आवश्‍यकता असल्याचे भारताचे मत आहे. नेतान्याहू यांनीही युद्धाच्या सद्यःस्थितीची माहिती दोवाल यांना दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com