Video : संसदेत कामकाज सुरु असतानाच त्याने केले प्रपोज; अन्...

वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

इटलीच्या संसदेत एका खासदारांनी सभागृहाच्या कामकाजादरम्यान सगळ्यांसमोर आपल्या प्रेयसीला लग्नासाठी प्रपोज केलं. सभागृहात चर्चा सुरू असतानाच त्यांनी हे कृत्य केले आहे. सभागृहात चालू असलेली चर्चा थांबवून या खासदाराने त्याच्या प्रेयसीला प्रजोज केले.

इटली : इटलीच्या संसदेत एका खासदारांनी सभागृहाच्या कामकाजादरम्यान सगळ्यांसमोर आपल्या प्रेयसीला लग्नासाठी प्रपोज केलं. सभागृहात चर्चा सुरू असतानाच त्यांनी हे कृत्य केले आहे. सभागृहात चालू असलेली चर्चा थांबवून या खासदाराने त्याच्या प्रेयसीला प्रजोज केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

खासदाराची प्रेयसी यावेळी प्रेक्षकांमध्ये बसली होती. या खासदारांचं नाव फ्लेवियो डी मुरो असं आहे. तर त्यांच्या गर्लफ्रेन्डचं नाव एलिसा डी लिओ आहे. एलिसाने मुरो यांचं लग्नाचं प्रपोजल स्वीकारलं. त्यानंतर सभागृहातील इतर खासदरांनी त्यांचं अभिनंदनही केलं. असं असलं तरी सभागृहाचे अध्यक्ष रॉबर्टो फिको यांनी चर्चेदरम्यान खासदार फ्लेवियो यांनी केलेल्या कारनाम्यावर नाराजी व्यक्ती केली आहे.

राजभवन स्फोटकांनी उडविण्याची पत्राद्वारे धमकी

मी तुमच्या या कारनाम्याने प्रभावित नक्कीच झालो, पण सभागृहाच्या कामकाज थांबवून असं करणं योग्य नसल्याचे सभागृहाच्या अध्यक्षांनी यावेळी म्हटले. स्थानिक माध्यमांच्या बातम्यानुसार फ्लेवियो आणि एलिसा गेल्या सहा वर्षांपासून इटलीच्या वेंटीमिग्लियामध्ये एकत्र राहतात. एलिसा त्यांच्या वैयक्तिक आणि राजकीय जीवनात सर्वात जवळची व्यक्ती आहे. ३३ वर्षीय खासदार फ्लेवियो डी मुरो यांनी गेल्यावर्षी मार्चमध्ये विजय मिळवला होता. असून लीग पार्टीचे सदस्य आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Italian MP Proposed To His Girlfriend In Middle Of Parliamentary Debate

टॅग्स