esakal | इटलीमध्ये कोरोनाचे 100 हून अधिक बळी; शाळा, महाविद्यालये बंद
sakal

बोलून बातमी शोधा

corona

कोरोना हा संसर्गजन्य रोग असून, त्यामुळे सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना एकत्र येण्याचे टाळण्यास सांगितले आहे. इटलीमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 107 वर पोहचली आहे.

इटलीमध्ये कोरोनाचे 100 हून अधिक बळी; शाळा, महाविद्यालये बंद

sakal_logo
By
वृत्तसंस्था

रोम : कोरोना व्हायरसमुळे इटलीमध्ये हाहाकार उडाला असून, आतापर्यंत 107 जणांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे सरकारने शाळा व महाविद्यालये 15 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप 

कोरोना हा संसर्गजन्य रोग असून, त्यामुळे सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना एकत्र येण्याचे टाळण्यास सांगितले आहे. इटलीमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 107 वर पोहचली आहे. तर, 3 हजारांहून अधिक जणांना लागण झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 28 जणांचा बळी गेला आहे.

कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारचे आपत्कालीन नियोजन

चीनमधील वुहान शहरातून या व्हायरसचा प्रसार झाला आहे. चीनमध्ये 3 हजारांच्या आसपास नागरिकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. त्यानंतर इटलीमध्ये सर्वाधिक बळी गेले आहेत. इटलीत पोप फ्रान्सिस यांनाही सर्दी-ताप असल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली काय, अशी चर्चा सुरु झाली आहे. चीननंतर दक्षिण कोरिया, जपान, इटली आणि इराण या देशांतील नागरिकांवर सर्वांचे लक्ष आहे. भारतातही या रोगाचे रुग्ण सापडले आहेत.

loading image