Japan first female Prime Minister : जपान रचणार इतिहास! देशाला मिळणार पहिल्या महिला पंतप्रधान; जाणून घ्या, कोण आहेत साने ताकाइची?

Japan first female Prime Minister Sanae Takaichi : सत्ताधारी पक्ष एलडीपीच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली; जाणून घ्या, भारताबद्दल काय आहेत विचार?
Sanae Takaichi, the rising political leader poised to become Japan’s first female Prime Minister.

Sanae Takaichi, the rising political leader poised to become Japan’s first female Prime Minister.

esakal

Updated on

Who is Sanae Takaichi? : जपानमधील सत्तारूढ पक्ष लिबरल डेमोक्रेटिक पार्टी (LDP)ने शनिवारी माजी आर्थिक सुरक्षा मंत्री साने ताकाइची यांना आपला प्रमुख नेता म्हणून निवडले आहे. ताकाइची यांच्या या निवडीबरोबरच, त्या आता जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधानही बनणार असल्याचे निश्चित झाले आहे. जपानमध्ये पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी ७ सप्टेंबर रोजी राजीनामा दिल्यानंतर लिबरल डेमोक्रेटिक पार्टीने ४ ऑक्टोबर रोजी आपल्या नव्या अध्यक्षासाठी निवडणूक घेतली, यामध्ये ताकाइची या विजयी झाल्या आहेत. 

या निवडणुकीच्या रिंगणात एकूण पाच उमेदवार होते, परंतु  प्रमुख लढत ही माजी आर्थिक सुरक्षा मंत्री साने ताकाइची आणि कृषी मंत्री शिंजिरो कोइजुमी या दोन नेत्यांमध्येच होती. या महालढतीत ताकाइची यांनी रनऑफ वोटिंगमध्ये कृषीमंत्री शिंजिरो कोइजुमी(माजी पंतप्रधान जुनिचिरो कोइजुमी यांचे पुत्र) यांना पराभूत केले.

किती मतं मिळवली? -

पहिल्या राउंडमध्ये ताकाइची यांना १८३ मतं आणि कोइजुमी यांना १६४ मतं मिळाली. मात्र कुणालाही बहुमत न मिळाल्याने, रनऑफ केलं गेलं. या मतदानात २९५ एलडीपी खासदार आणि जवळपास दहा लाख पक्ष सदस्यांनी सहभाग घेतला. खरंतर हे जपानच्या एकूण लोकसंख्येचा केवळ एक टक्का भाग आहे.

Sanae Takaichi, the rising political leader poised to become Japan’s first female Prime Minister.
Donald Trump ultimatum : ट्रम्प यांचा हमासला ४८ तासांचा अल्टिमेटम! ; म्हणाले, ‘’आता जर ऐकलं नाहीतर...’’

 कोण आहेत साने ताकाइची? -

६४ वर्षीय साने ताकाइची या एक रूढीवादी नेत्या मानल्या जातात. त्या वादग्रस्त यासुकुनी मंदिरात नियमित जाणे, जपनाच्या शांततावादी संविधानात बदल आणि ताइवानसोबत सुरक्षा सहकार्य वाढवण्यासारख्या धोरणांचं समर्थन करत राहिल्या आहेत. तसेच त्यांनी अमेरिकेसोबतच्या गुंतवणूक करारांचा आढावा घेण्याचाही सल्ला दिलेला आहे.

रनऑफआधी आपल्या भाषणात ताकाइची यांनी म्हटले होते की, देशभरातून झालेली प्रचंड टीकेने मला प्रेरणा दिला. ज्यामध्ये म्हटले गेले होते की, मला समजत नाही की एलडीपी कुणासाठी उभी आहे. मी लोकांची रोजचे आयुष्य आणि भविष्य याबाबतच्या त्यांच्या चिंतेचे आशेत रूपांतर करू इच्छित आहे.

Sanae Takaichi, the rising political leader poised to become Japan’s first female Prime Minister.
Mehbooba Mufti Statement : ‘’लडाख, POKमध्ये Gen-Z… ’’ ; मेहबूबा मुफ्तींनी केलं मोठं विधान!

आपल्या या विजयाबरोबरच त्या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत. त्यांच्या मोहिमेचे मुख्य लक्ष देशाची आर्थिक वाढ आणि सुरक्षेवर आहे. ताकाइची यांनी दहा वर्षांत जपानच्या अर्थव्यवस्थेला दुप्पट करण्याची योजना सादर केली आहे. याचबरोबर ताकाइची या भारताला विशेष धोरणात्मक भागीदारही मानतात. तसेच क्वाड आणि इंडो—ॅसेफिकमध्ये सहकार्य वाढवण्यावरही यांचा जोर आहे.

एपीच्या मते नव्या पंतप्रधानांच्या औपचारिक पुष्टीसाठी संसदीय मतदान ऑक्टोबरच्या मध्यात होण्याची अपेक्षा आहे. जो कुणी पंतप्रधान बनेल, त्यास लगेचच राजनैतिक आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं असणार आहे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा, जी ऑक्टोबरच्या शेवटी दक्षिण कोरियामध्ये होणाऱ्या आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य शिखर परिषदेत निश्चित आहे. या बैठकीत जपानवर संरक्षण खर्च वाढवण्यासाठीचा दबाव टाकला जाऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com