Japan Mpox Death : जपानमध्ये 'एमपॉक्स'चा पहिला बळी, आरोग्य यंत्रणा सतर्क; जगाचं टेन्शन वाढलं

WHO on Mpox : एमपॉक्स हा नवा आजार नसून, मंकीपॉक्स या आजाराचंच नवीन नाव आहे.
Japan Mpox
Japan MpoxeSakal

Japan Records first M-pox death : जपानमध्ये 'एमपॉक्स'ची लागण झालेल्या एका 30 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला असल्याचं समोर आलं आहे. देशाच्या आरोग्य मंत्रालयाने याची पुष्टी केली आहे. एमपॉक्सची लागण झाल्यामुळे बळी जाण्याची जपानमधील ही पहिलीच घटना आहे. मात्र, यामुळे जगाचं टेन्शन वाढलं आहे.

रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या रुग्णाला इम्युनो डेफिशिअन्सीचा त्रास होता. ही व्यक्ती जपानच्या साईतामा प्रांतात राहत होती. यावर्षी मे महिन्यातच जागतिक आरोग्य संघटनेने असं जाहीर केलं होतं की एमपॉक्स ही जागतिक आरोग्य आणीबाणी नाही. मात्र, आता जपानमध्ये समोर आलेल्या प्रकरणामुळे चिंता निर्माण झाली आहे.

'मंकीपॉक्स' म्हणजेच 'एमपॉक्स'

एमपॉक्स हा नवा आजार नसून, मंकीपॉक्स या आजाराचंच नवीन नाव आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात WHO ने हे नाव बदललं होतं. 2022 च्या जुलैमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने एमपॉक्स ही जागतिक आणीबाणी असल्याची घोषणा केली होती. याच दरम्यान जपानमध्ये एमपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला होता.

Japan Mpox
Nashik Zika Virus Update: झिका रुग्ण आढळलेल्या भागात मच्छरदाणी वापरा! वैद्यकीय विभागाचा नागरिकांना सल्ला

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, संक्रमित व्यक्ती किंवा प्राण्याच्या संपर्कात आल्यामुळे याची लागण होते. उंदीर, खार किंवा माकडांच्या माध्यमातून हा सर्वाधिक पसरतो.

लक्षणे

या आझाराची लक्षणे सर्दी-पडशाप्रमाणे असतात. यासोबतच स्पष्ट दिसणारं लक्षण म्हणजे शरीरावर ठिकठिकाणी पुरळ येणे. बहुतांश प्रकरणांमध्ये ही लक्षणे सौम्य मात्र घातक असतात. यासोबतच लक्षणांमध्ये ताप येणे, डोकेदुखी हेदेखील आहेत. ही लक्षणं दोन ते चार आठवडे राहू शकतात.

Japan Mpox
चीनमधील न्यूमोनिया खरोखरच पालकवर्गाची काळजी वाढविणारा आहे का?

बचाव

एमपॉक्सपासून बचाव करण्याचा उपाय म्हणजे, संक्रमित प्राण्यांच्या संपर्कात न येणे. यासाठी आजारी किंवा मृत प्राण्यांपासून दूर राहणं गरजेचं आहे. तसंच मांसाहारी पदार्थ चांगल्या प्रकारे शिजवून खाणंही गरजेचं असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com