Jensen Huang Nvidia : एनव्हिडियाच्या सीईओचे आणखी एक अफेअर समोर; जेन्सेन हुआंग ज्या महिला कर्मचाऱ्यासोबत हॉटेलमध्ये आढळले, ती नेमकी कोण?

Kimberly Powell Allegations : एनव्हिडियाच्या हेल्थकेअर विभागाच्या उपाध्यक्ष किम्बर्ली पॉवेल यांच्याशी कथित विवाहबाह्य संबंध असल्याचे इंग्रजी वर्तमानपत्राने दावा केला आहे. त्या २००८ पासून एनव्हिडियामध्ये आहेत. २०१७ मध्ये हेल्थकेअर विभागाच्या उपाध्यक्ष झाल्या
Jensen Huang Faces New Nvidia Affair Allegations

Jensen Huang Faces New Nvidia Affair Allegations

esakal

Updated on: 

जगातील आघाडीची एआय चिप उत्पादक कंपनी एनव्हिडियाचे (Nvidia) मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सेन हुआंग पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. हुआंग यांच्या आणखी एका कथित विवाहबाह्य संबंधाची माहिती समोर आल्याचा दावा 'एका इंग्रजी वर्तमानपत्राने केला आहे. यापूर्वी सिंगापूरस्थित कंपनीतील वरिष्ठ अधिकारी ॲलिस हुआंग यांच्याशी असलेल्या संबंधांमुळे ते चर्चेत आले होते. आता एनव्हिडियामध्येच त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्याशी त्यांचे संबंध असल्याचे वृत्त समोर आले आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...