

Jensen Huang
esakal
Washington: एका पाठोपाठ एक अफेअर्स बाहेर आल्यानंतर काही दिवसांपूर्वी एनव्हिडियाचे सीईओ जेन्सेन हुआंग यांना राजीनामा द्यावा लागला होता. जेन्सेन यांच्या एनव्हिडियातील तब्बल ३३ वर्षांच्या प्रवासाला ब्रेक लागला होता. त्यांच्या जागी कोण येणार याच्याही जोरदार चर्चा सुरू झाली होती. मात्र, राजीनामा दिल्यानंतर अवघ्या चारच दिवसांत जेन्सेन यांच्या घरवापसीची अटकळ बांधली जात आहे. त्यासाठी पडद्याच्या मागे मोठ्या हालचाली सुरू असल्याचे समजते. त्यासाठी दस्तुर खुद्द एलॉन मस्क यांच्यापासून व्हाइट हाऊसपर्यंत अनेकांनी 'देव पाण्यात ठेवले' आहेत.