Jensen Huang Resigns : 'एनव्हिडिया'चे साईओ जेन्सेन हुआंग यांचा राजीनामा; तिसऱ्या प्रेमप्रकरणाने उडाली खळबळ

Nvidia Investigation : जेन्सेन यांचे कंपनीतील आरोग्यसेवा विभागाच्या उपाध्यक्ष किम्बर्ली पॉवेल यांच्यासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा दावा समोर आला आहे. याशिवाय कंपनीतील आणखी एका महिला कर्मचाऱ्यासोबतही त्यांचे संबंध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Jensen Huang Resigns as Nvidia CEO

Jensen Huang Resigns as Nvidia CEO

esakal

Updated on: 

एनव्हिडिया (Nvidia) चे मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सेन हुआंग यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यांची माजी मैत्रीण ॲलिस हुआंग ही चिनी गुप्तहेर होती का, याबाबत अमेरिकेच्या तपास यंत्रणांना अद्याप ठोस पुरावे मिळालेले नाहीत. त्यातच जेन्सेन यांचे कंपनीतील आणखी एका महिला कर्मचाऱ्यासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा दावा समोर आल्याने चर्चेला उधाण असतानाच त्यांच्या तिसऱ्या प्रेमप्रकरणाची माहिती समोर आली आहे. यानंतर हुआंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...