ग्लान्समध्ये Jio करणार 200 दशलक्ष डॉलर्सची गंतवणूक; आशियाबाहेर होणार विस्तार

कृत्रिम बुद्धिमत्तेवर (Artificial Intelligence) आधारित लॉक स्क्रीन प्लॅटफॉर्म ग्लान्समध्ये (Glance) जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेड (Jio Platforms Limited) 200 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे.
Jio investment in glance
Jio investment in glanceSakal

कृत्रिम बुद्धिमत्तेवर (Artificial Intelligence) आधारित लॉक स्क्रीन प्लॅटफॉर्म ग्लान्समध्ये (Glance) जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेड (Jio Platforms Limited) 200 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. ग्लान्सने सोमवारी ही माहिती दिली. हा निधी फंडिंग सीरीज डी राऊंड् अंतर्गत असेल. हा व्यवहार सर्व रेग्युलेटरी मंजुरींच्या अटी- शर्यंतीच्या अधीन राहून केला जाईल असे कंपनीनं सागिंतले.

जिओच्या या गुंतवणुकीचा उद्देश आशियाबाहेर अमेरिका, ब्राझील, मेक्सिको आणि रशिया यासारख्या काही मोठ्या बाजारपेठांमध्ये ग्लान्स लाँच करणे हा आहे. कंपनीला आपल्या प्लॅटफॉर्मला लॉक-स्क्रीनवर जगातील सर्वात मोठे लाइव्ह कंटेंट आणि कॉमर्स इकोसिस्टम बनवायचा आहे. म्हणूनच हा निधी जागतिक विस्तारासाठी वापरला जाईल. ग्लान्सला जिओ प्लॅटफॉर्मसह गुगल आणि सिलिकॉन व्हॅली-आधारित व्हेंचर फंड मिथ्रिल कॅपिटलकडून समर्थन मिळाले आहे.

Jio investment in glance
Jio देणार सर्वांना परवडणारी उपग्रह आधारित ब्रॉडबँड सेवा

प्रस्तावित गुंतवणुकीसोबत, Glance ने रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडसोबत (Reliance Retail Ventures Limited ) भागीदारीचा करार देखील केला आहे, या करारामुळे ग्लान्सच्या (Glance) च्या 'लॉक स्क्रीन प्लॅटफॉर्म'ला JioPhone Next स्मार्टफोनमध्ये जोडले जाऊ शकते. त्यामुळे लाखो जिओ वापरकर्त्यांना त्याचा फायदा होईल. या करारामुळे Glance, Reliance Retail आणि Jio मधील उपकरणे, वाणिज्य, कंटेंट आणि गेमिंग इकोसिस्टममध्ये आणखी धोरणात्मक सहकार्याची अपेक्षा आहे.

Jio investment in glance
Jio मोठ्या धमाक्याच्या तयारीत, लवकरच लॉन्च होणार स्वस्त लॅपटॉप

Glance चे लॉक स्क्रीन प्लॅटफॉर्म आशियाच्या बाजारपेठेतील 400 दशलक्ष उपकरणांमध्ये आधीपासून उपस्थित आहे. Glance ने आपल्या वापरकर्त्यांना कोणताही अॅप न शोधता, डाउनलोड न करता एवढंच नाही तर तुमचा फोन न उघडता इंटरनेटचा सर्वोत्तम अनुभव दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com