ट्रम्प यांनी समन्वय साधला नाही तर अनेक अमेरिकन मृत्यूमुखी पडतील - बायडेन

joe biden
joe biden

वॉशिंग्टन : अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक ऐन कोरोना काळात झाली. अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वांत जास्त आहे. अशा काळात अत्यंत चुरशीची अशी ही निवडणूक पार पडली. मात्र, अद्याप ही निवडणूक औपचारिकरित्या संपलीय असं म्हणता येणार नाही कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला पराभव मान्य केला नाहीये. अशातच आता कोरोनाची हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीला सावरण्यावरुन राजकारण पहायला मिळतंय. जानेवारी महिन्यापर्यंत डोनाल्ड ट्रम्प हेच राष्ट्राध्यक्ष पदी असणार आहेत. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलंय की, जर विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि माझ्यात जर समन्वय साधण्यात कमतरता भासली तर अनेक अमेरिकन लोक कोरोनाच्या प्रादुर्भावाने मृत्यूमूखी पडतील. 

मीडियाने जाहीर केल्यानुसार, डेमोक्रॅटीक पक्षाचे जो बायडेन यांनी तीन नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. मात्र, ट्रम्प यांनी आपला पराभव अमान्य करत निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप करत अनेक राज्यांमध्ये कायदेशीर लढाई छेडली आहे. बायडेन यांनी म्हटलंय की, जर आमच्यात समन्वय साधला गेला नाही तर अनेक लोक मरतील. डोनाल्ड ट्रम्प हे आपला पराभव मान्य करत नाहीयत तसेच ते सत्तांतरणाच्या प्रक्रियेत समन्वय साधत नाहीयेत, या प्रश्नावर जो बायडेन यांनी  हे वक्तव्य डेलावेअर या आपल्या मतदारसंघात बोलताना केलं आहे. 

लस महत्त्वाची आहे. आपण लस कशी मिळवणार आहोत? 300 दशलक्ष अमेरिकन लोकांचे आपण कसे लशीकरण करणार आहोत? याबाबतचे काय नियोजन आहे? तो पूर्णत्वास नेणे हे सध्या आपल्या गरजांपैकी सर्वांत आधी प्राधान्य देण्याची बाब आहे. या मार्गावर काम करणे हे एक प्रचंड, प्रचंड आणि मोठा उपक्रम आहे आणि जागतिक आरोग्य संघटना आणि उर्वरित जगाला या गोष्टींमध्ये सहकार्य करण्याचे देखील काम आहे, असं त्यांनी म्हटलंय. तर ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे की त्यांच्याकडे याबाबतचे नियोजन आहे, ज्यामध्ये लस घेणे आणि ती वितरित करणे याबाबतचे नियोजन आहे. हे नियोजन सुरू करण्यासाठी जर आपल्याला 20 जानेवारीपर्यंत  म्हणजे नव्या अध्यक्षीय कार्यकाळापर्यंत थांबायचे असेल तर आपण महिना-दिड महिना मागे राहू. आणि म्हणूनच आताच आमच्यात समन्वय हवाय. आताच किंवा जितक्या लवकर शक्यय तितक्या लवकर हा समन्वय हवाय. 

अमेरिकेत आतापर्यंत 11,538,280 इतके रुग्ण सापडले आहेत. तर 252,652 इतक्या लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 7,019,364 लोक बरे झाले आहेत. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com