काबूलमध्ये भारतीय दुतावासाजवळ स्फोट

वृत्तसंस्था
बुधवार, 31 मे 2017

काबूलमधील वजीर अकबर खान भागात असलेल्या इराणच्या दुतावासाला लक्ष्य करुन स्फोट घडविण्यात आला. अध्यक्षांचे निवासस्थानही स्फोटाच्या ठिकाणापासून जवळच आहे.

काबूल - अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये आज (बुधवार) सकाळी भारतीय दुतावासाजवळ शक्तीशाली बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला. मात्र, या स्फोटात दुतावासातील एकही भारतीय नागरिक जखमी झालेला नाही. मात्र, या स्फोटात 60 जण जखमी झाल्याचे सरकारी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

भारतीय दुतावासापासून दीड किमी अंतरावर हा शक्तीशाली स्फोट झाला. इराणच्या दुतावासाला लक्ष्य करून हा स्फोट घडविण्यात आला. या स्फोटात 60 जण जखमी असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे अफगाणिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले. स्फोटानंतर भारतीय दुतावासाच्या इमारतीच्या काच्या फुटल्या. या स्फोटानंतर भारतीय दुतावासातील सर्वजण सुखरुप आहेत, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विट केले आहे.

काबूलमधील वजीर अकबर खान भागात असलेल्या इराणच्या दुतावासाला लक्ष्य करुन स्फोट घडविण्यात आला. अध्यक्षांचे निवासस्थानही स्फोटाच्या ठिकाणापासून जवळच आहे. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेकडून स्वीकारण्यात आलेली नाही.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :
मॉन्सून 8 जूनला मुंबईत: हवामान विभाग​
लोकांनी काय खावे हे सरकार ठरवत नाही: केंद्रीय मंत्री
बीफ फेस्टिव्हलवरून विद्यार्थ्याला मारहाण​
मुख्यमंत्र्यांचा शेट्टी, जयंतरावांवर नेम; सदाभाऊंची ढाल​
दिल्ली आयआयटीतील विद्यार्थीनीची आत्महत्या

जनावरे विक्री बंदीबाबत दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सूट शक्‍य
शेतकरी संपावर काहीही साध्य होणार नाही : माधव भंडारी
दीड पायाच्या ‘लक्ष्मी’ची झेप
#स्पर्धापरीक्षा - बलुचिस्तान
शहरांच्या जागतिक क्रमवारीत पुणे तेरावे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kabul Blast: Massive explosion near Indian Embassy in Afghan capital, no casualties reported