
उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन मंगळवारी खास ट्रेनने बिजिंगला पोहोचले आहेत. चीनमध्ये ते राष्ट्रपती शी जिनपिंग आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत लष्करी परेडमध्ये सहभागी होणार आहेत. किम आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यासह जगभरातील २६ देशांचे नेत या परेडमध्ये असणार आहेत. किम जोंग उन त्यांच्या १४ वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच बहुपक्षीय कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. अमेरिकेला थेट आव्हान देणाऱ्या ३ देशांचे नेते एकत्र येत असल्यानं याकडे जगाचं लक्ष लागून राहिलं आहे.