

उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन चीनला ट्रेनने रवाना झाले आहेत. चीनमध्ये ते शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत ते लष्करी परेडमध्ये भाग घेणार आहेत. मंगळवारी त्यांच्या हिरव्या रंगाच्या ट्रेनमधून प्योंगयांगहून बिजिंगसाठी किम जोंग रवाना झाले. किम जोंग यांची ही ट्रेन खास त्यांच्यासाठी तयार केलीय. खूप कमी वेगाने धावणाऱ्या या ट्रेनचा वापर गेल्या काही दशकांपासून उत्तर कोरियाचे नेते करतात.