King Charles III: राज्याभिषेकावर हजार कोटींचा खर्च; पैसे सरकारी तिजोरीतून जाणार

कसा असतो हा राज्याभिषेक, याविषयी जाणून घ्या...
King Charles III
King Charles III Sakal

तिसरे किंग चार्ल्स यांचा आज ब्रिटनमध्ये राज्याभिषेक होणार आहे. राणी एलिझाबेथ II च्या मृत्यूनंतर चार्ल्स सम्राट बनले, आता त्यांना राज्याभिषेक करण्याच्या शाही परंपरेचे पालन करावं लागेल. काय असते ही परंपरा, कसा राज्याभिषेक होतो, याविषयी जाणून घ्या...

ब्रिटनमध्ये राज्याभिषेक कसा होतो?

- सम्राटाच्या डोक्यावर औपचारिक पद्धतीने राजमुकुट ठेवला जातो.

- राज्याभिषेक हा संस्कार असून धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा विधी मानला जातो.

- वेस्टमिनिस्टर अॅबे इथं गेल्या ९०० वर्षांपासून ही प्रथा पाळली जाते.

- ब्रिटनचे राजे व राण्यांना १०६६ मध्ये विल्यम द कॉन्करनंतर वेस्ट मिनिस्टर अॅबेमध्ये मुकुट परिधान केला जातो.

King Charles III
King Charles III : इतिहासात पहिल्यांदाच राज्य़ाभिषेकात हिंदू धर्मगुरू सहभागी; मुंबईच्या डबेवाल्यांनाही आमंत्रण

राज्याभिषेकावर खर्च किती?

- राजा चार्ल्स तिसरे यांच्या राज्याभिषेक सोहळ्यावर १०२१.५ कोटी रुपये खर्च होणार असल्याचा अंदाज आहे.

- हा सगळा खर्च ब्रिटीश सरकार करणार आहे.

- हा खर्च राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या १९५३ मधल्या राज्याभिषेकापेक्षा दुप्पट आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com