esakal | रामाचा जन्म नेपाळमधला! - के. पी. ओली
sakal

बोलून बातमी शोधा

KP-Oli

खरी अयोध्या नेपाळमध्ये असून प्रभू श्रीरामाचा जन्मही नेपाळमधील थोरी या गावात झाला होता, असा दावा करत नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांनी वाद ओढवून घेतला आहे. त्यांच्यावर भाजपने जोरदार टीका केली आहे.

रामाचा जन्म नेपाळमधला! - के. पी. ओली

sakal_logo
By
पीटीआय

काठमांडू - खरी अयोध्या नेपाळमध्ये असून प्रभू श्रीरामाचा जन्मही नेपाळमधील थोरी या गावात झाला होता, असा दावा करत नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांनी वाद ओढवून घेतला आहे. त्यांच्यावर भाजपने जोरदार टीका केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नेपाळी कवी भानुभक्त यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना ओली म्हणाले की, ''नेपाळ जा सांस्कृतिक अतिक्रमणाला बळी पडलेला देश आहे. या देशाचा इतिहास बदलून टाकला आहे. देवी सीतेचा विवाह अयोध्येचा राजकुमार श्रीरामबरोबर झाल्याचे आपण मानतो. ही अयोध्या म्हणजे नेपाळमधील वीरगंज गाव असून येथील थोरी येथे रामजन्म झाला होता. अयोध्या येथून दूर असल्याने संपर्क यंत्रणा नसताना पूर्वीच्या काळी असा विवाह शक्य नाही. वाल्मिकी आश्रमही नेपाळमध्येच आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्रपतीपदापासून दूर ठेवणार ही पुस्तके! 

‘राजा दशरथ नेपाळचा सत्ताधीश होता, त्यामुळे भगवान श्रीरामही नेपाळीच असणार, असा तर्क ओली यांनी लावला. अठराव्या शतकातील कवी भानुभक्त यांनी वाल्मिकी रामायण नेपाळी भाषेत आणले होते. 

...म्हणून भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

भाजपने ओली यांच्यावर टीका केली. जनतेच्या भावनांशी खेळल्यास भारतात ज्याप्रमाणे डाव्यांची अवस्था झाली, तशीच नेपाळमध्येही होईल, असे भाजप प्रवक्ते विजय सोनकर शास्त्री यांनी म्हटले. प्रभू रामचंद्र हा श्रद्धेचा विषय असून नेपाळच्या पंतप्रधानासह कोणालाही त्याच्याशी खेळण्याचा अधिकार नाही. ओली यांच्या भारतविरोधी धोरणांमुळे आणि मतांमध्ये त्यांच्याच पक्षात फूट पडण्याची चिन्हे असून त्यांचे पदही धोक्यात आले आहे.

Edited By - Prashant Patil