esakal | आरोपीने मृताचं हृदय बटाट्यासोबत शिजवलं; मारण्यापूर्वी आणखी दोघांना खायला वाढलं

बोलून बातमी शोधा

arrested}

अमेरिकेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.

आरोपीने मृताचं हृदय बटाट्यासोबत शिजवलं; मारण्यापूर्वी आणखी दोघांना खायला वाढलं
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. अमेरिकेतील ओक्लाहोमामध्ये ट्रिपल मर्डर करणाऱ्या आरोपीने एका मृत महिलेच्या शरीराला कापून त्यातून हृदय काढलं. त्यानंतर त्याला बटाट्यासोबत शिजवून त्याच्याच नातेवाईकांना मारण्यापूर्वी खायला दिलं. ओक्लाहोमा सिटी न्यूज 4 टीव्ही आणि ओक्लाहोमन वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, लॉरेंस पॉल एंडरसन नावाच्या आरोपीने सर्वांत आधी आपल्या शेजारणीची चाकूने भोसकून हत्या केली. त्यानंतर तिच्या शरीराच्या भागांना कापून बाजूला केलं. 

हेही वाचा - ब्रेकिंग: निरव मोदीला भारतात धाडण्याचा रस्ता मोकळा; लंडनच्या कोर्टाने दिला मोठा निर्णय

पोलिसांनी मंगळवारी चिकाशामधील ग्रॅडी काउंटी कोर्टामध्ये सांगितंल की, यानंतर आरोपीने मृताच्या हृदयाला शिजवून त्याच्याच अंकल-आंटीला खायला घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एंडरसनने त्या अंकल आणि त्यांची चार वर्षांच्या नातीची 9 फेब्रुवारी रोजी घरातच हत्या केली. तसेच त्यांच्या पत्नीला गंभीररित्या मारहाण करुन जखमी केलं. न्यायालयात सादर केलेल्या एका सर्च वारंटमध्ये लिहलंय की, त्याने आपल्या परिवाराला राक्षसांपासून वाचवण्यासाठी मृताच्या हृदयाला बटाट्यांसोबत शिजवून त्याच्याच नातेवाईकांना खायला घालण्याचा प्रयत्न केला. 

हेही वाचा - 1 मार्चपासून कोणाला मिळणार कोरोना लस? जाणून घ्या रजिस्ट्रेशनची संपूर्ण प्रक्रिया

एंडरसन या आरोपीची पार्श्वभूमी गुन्हेगारीचीच राहिली आहे. तो या गुन्ह्याच्या आधीच एक आठवडा तुरुंगातून सुटून आला होता. ओक्लाहोमाचे गव्हर्नर केविन स्टिट यांनी वेळेआधीच त्याची सुटका केली होती. त्याला 2017 मध्ये ड्रग्जमधील आरोपामध्ये 20 वर्षांचा तुरुंगवास सुनावला गेला होता. मीडियात आलेल्या रिपोर्ट्सनुसार, मंगळवारी एंडरसनने कोर्टामध्ये हत्येचा आरोप कबूल केला आहे.