
पिंक डायमंडची जगातील सर्वांत मोठी खाण आज कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या खाणीतील सगळी मौल्यवान रत्ने काढून घेण्यात आली असल्याने ती बंद करण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत असे खाण उत्खनन क्षेत्रातील आघाडीची कंपनी रिओ टिंटोने सांगितले.
सिडनी - पिंक डायमंडची जगातील सर्वांत मोठी खाण आज कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या खाणीतील सगळी मौल्यवान रत्ने काढून घेण्यात आली असल्याने ती बंद करण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत असे खाण उत्खनन क्षेत्रातील आघाडीची कंपनी रिओ टिंटोने सांगितले.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम भागातील किम्बर्ले परिसरामध्ये ही खाण असून आर्गेले असे तिचे नाव आहे. अतिशय दुर्मिळ मानले जाणारे पिंक डायमंड केवळ याच खाणीमध्ये आढळून येत असत. जगातील नव्वद टक्के पिंक डायमंड हे याच खाणीतील असल्याचे बोलले जाते.
'लोकांच्या नोकऱ्या वाचतील, प्रतिस्पर्ध्यांची उत्पादने खरेदी करा', ‘बर्गर किंग’चे औदार्य
एका अँग्लो- ऑस्ट्रेलियन कंपनीने १९७९ मध्ये ही खाण शोधून काढली होती. प्रत्यक्षात येथे खोदकाम सुरू होण्यास मात्र चार वर्षांचा काळ लागला होता. या खाणीतून आतापर्यंत ८६५ दशलक्ष कॅरेटच्या कच्च्या हिऱ्यांचे उत्पादन घेण्यात आले होते. ही खाण बंद करण्याच्या झालेल्या अधिकृत कार्यक्रमास या खाणीत काम केलेले माजी कर्मचारी आणि स्थानिक जमिनींचे मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
US Election : चुरशीच्या मतदानाला प्रारंभ; मध्यरात्री नोंदवले गेले पहिले मत
बंद करण्यास पाच वर्षे लागणार
ही खाण ३७ वर्षांची असून ती पूर्णपणे बंद करण्यासाठी आणखी पाच वर्षांचा अवधी लागेल असे तज्ञांचे म्हणणे आहे. ही खाण बंद झाल्यानंतर स्थानिकांचे पुनर्वसन करण्यात येईल आणि त्यांना येथील जमिनीचे तुकडे देण्यात येतील, असे येथील खाणीचे व्यवस्थापक अँड्र्यू विल्सन यांनी सांगितले. मागील दोन दशकांमध्ये पिंक डायमंडची किंमत ही पाचशे पटीने वाढली असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.
Edited By - Prashant Patil