अखेर अमेरिकेच्या इतिहासातलं सर्वात मोठं शटडाऊन ४३ दिवसांनी संपुष्टात आलं. बुधवारी रात्री सिनेटमध्ये शटडाऊन संपवण्याच्या बिलाला मंजुरी देण्यात आली. यात बिलाच्या बाजूने २२२ तर बिलाच्या विरोधात २०९ मतं पडली. व्हाइट हाऊसने याबाबत अधिकृत माहिती दिलीय. ट्रम्प यांनी विधेयकावर सही केली असून सरकारी कामकाज आता औपचारिकरित्या सुरू होईल. अमेरिकेच्या जीडीपीसह अमेरिकेतली ४ कोटी पेक्षा जास्त लोकांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.