क्यार पाठोपाठ अता 'माहा' चक्रीवादळाचा धोका; काय आहेत अपडेट्स?

टीम ई-सकाळ
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

श्रीलंकेच्या वायव्येला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. लवकरच याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. याच बरोबर 'माहा'ची वाटचाल जवळपास क्यार सारखीच असल्याची शक्यता स्कायमेटद्वारे वर्तवली जात आहे.  

पुणे : गेल्या आठवड्यात क्यार चक्रीवादळाचा प्रभाव दक्षिण कोकण, गोवा आणि उत्तर कर्नाटकाच्या किनारपट्टीवर दिसला होता. क्यार या चक्रीवादळाच्या पाठोपाठ आता 'माहा' नावाचे चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळ तयार होत आहे. श्रीलंकेच्या वायव्येला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. लवकरच याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. याच बरोबर 'माहा'ची वाटचाल जवळपास क्यार सारखीच असल्याची शक्यता स्कायमेटद्वारे वर्तवली जात आहे.  

चक्रीवादळाला का देतात नाव? 

चला गोव्याला अल्हाददायक वातावरण अनुभवायला

'माहा'चा प्रवास !
माहा चक्रीवादळ दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात तयार होणार असून, याचा थेट परिणाम महाराष्ट्रावर कमी असणार आहे. माहा या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे तामिळनाडू, केरळ तसेच कर्नाटकातील व लक्षद्वीप येथील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. केरळ किनारपट्टीवर पुढील २४ तासांत ३५-४५ किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून, या वाऱ्यांचा वेग ५५ किलोमीटर पर्यंत पोहचू शकतो. याच बरोबर मालदीव आणि लक्षद्वीप येथील काही भागांमध्ये वाऱ्यांचा वेग ४०-५० किलोमीटर असून, त्यांचा सर्वोच्च वेग ताशी ६० किलोमीटर पर्यंत जाण्याची शक्यता आहे.  

पुण्यात कोथरूडमध्ये चंपा साडी सेंटरचे उद् घाटन

'माहा' चक्रीवादळ वायू, हिक्का, क्यार नंतर अरबी समुद्रात निर्माण होणारा चौथा चक्रीवादळ असेल. अरबी समुद्राच्या तुलनेत बंगालच्या खाडीमध्ये दर वर्षी बहुतेक चक्रीवादळांची निर्मिती होते, मात्र या वर्षी अरबी समुद्रात चक्रीवादळांची संख्या जास्त असल्याचे दिसून आले. 'माहा' हे नाव ओमान या देशाकडून प्राप्त झाले असून, पुढील चक्रीवादळाला 'बुलबुल' हे नाव पाकिस्तान या देशाकडून मिळणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maha cyclone is under formation updates india oman sri lanka