पुण्यात कोथरूडमध्ये 'चंपा साडी सेंटर'चे उद् घाटन; कोणी उघडलंय दुकान?

टीम ई-सकाळ
Wednesday, 30 October 2019

कोथरुडमधील दहा हजार महिलांना भाऊबीज म्हणून साड्या वाटण्याच्या भूमिकेवरून कोथरुडचे नवे आमदार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील आता विरोधकांच्या रडावर आले आहेत.

पुणे : कोथरुडमधील दहा हजार महिलांना भाऊबीज म्हणून साड्या वाटण्याच्या भूमिकेवरून कोथरुडचे नवे आमदार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील आता विरोधकांच्या रडावर आले आहेत. याच मुद्दयावरून मनसेपाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही पाटील यांचा निषेध करीत, आंदोलनाचा पवित्रा घेतला. अशा प्रकारे साड्या वाटण्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादीने "चंपा साडी सेंटर'चे प्रतिकात्मक उदघाटन केले.

उपमुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेतून या नेत्याचे नाव चर्चेत

चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी
दुसरीकडे मात्र, महिलांना साड्या वाटण्याच्या भूमिकेवर ठाम राहिलेल्या भाजपच्या नगरसेवकांनी बुधवारीही साड्यांचे वाटप केले. कोथरूडमधील मतदारसंघातून पाटील हे विजयी झाले असून, दिवाळीनिमित्ताने गरीब महिलांना साड्यांचा निर्णय पाटील यांनी केला. मात्र, पूरगस्तांना मदत केली नाही, तेव्हा पुणेकरांना महिलांना गरज नसतानाही साड्या का वाटप करीत आहेत, अशी विचारणा मनसे आणि आपच्या पदाधिकाऱ्यांनी केली. त्यानंतर साड्या वाटून देणार नाही,असा इशारा मनसेचे किशोर शिंदे यांनी दिला. तेव्हा काही नगरसेवकांनी र्आपापल्या भागातील महिलांना साड्यांचे वाटप केले. राजकीय पक्षांचा विरोध वाढत असूनही साड्यांचे वाटप करण्यावर पाटील ठाम राहिले. त्यानंतर मात्र, साड्या वाटपाचा मुद्दा चांगलाच गाजत राहिला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि आमदार चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करीत, चंपा साडी सेंटरचे उदघाटन करण्यात आले. 'पुणेकरांचा महिलांचा अवमान केल्याने पाटील यांनी राजीनामा द्यावा,' अशी मागणी तुपे यांनी केली आहे.

का केला मोदीेंनी शरद पवार यांना फोन?

मनसेचा विरोध 
कोल्हापूर आणि पुण्यातील पूरग्रस्त महिलांना साड्यांसह अनेक गृहपयोगी वस्तुंची गरज होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत पाटील आणि त्यांच्या पक्षाचे नगरसेवक कोथरुडमध्ये नवीन पायंडा पाडत असल्याचा आरोप मनसेचे विभागप्रमुख सुधीर धावडे यांनी केला. त्यानंतर साड्या वाटून देणार नाही, अशी भूमिका पाटील यांच्याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारी करणार आहे, असेही धावडे यांनी सांगितले. दरम्यान, मनसेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. आपचे शहराध्यक्ष मुकुंद कीर्दत यांनीही या प्रकाराचा निषेध व्यक्त केला आहे. 

चंद्रकांत पाटील यांना पुणेरी टोला

  1. एकाच सोसायटीत एकाच रंगाच्या साड्या नको, नाही महिलांमध्ये वाद होतील 
  2. साडी देताना दुपारच्या वेळेत दरवाजा उघडला नाही तर, साडी दारावरच्या पिशवीत ठेवावी 
  3. साडीवर कोणाचाही फोटो किंवा पक्षाचे चिन्ह नसावे, ते असेल ड्रायक्‍लिनचा खर्चही द्यावा लागेल 
  4. मागण्यांकडे काणाडोळा केला तर पुढच्या खेपेला मत मिळणार नाही 
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mns protest against saari distribution in kothrud bjp chandrakant patil