Maldives President Mohamed Muizzu: भारतविरोधी मुइझुंना विरोधक दाखवणार 'इंगा'; मालदीवच्या राष्ट्रपतींच्या अडचणी वाढल्या, सरकार पडणार?

Maldives President Mohamed Muizzu: मालदीवच्या चीन समर्थक सरकारविरोधात देशाच्या विरोधकांनी आघाडी उघडली आहे. मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइझु यांच्याविरोधात महाभियोगाची तयारी सुरू करण्यात आली आहे.
Maldives President Mohamed Muizzu
Maldives President Mohamed MuizzuEsakal

सत्तेत आल्यापासून भारतविरोधी भूमिका घेणारे मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइझु आता स्वत:च मोठ्या अडचणीत सापडले आहेत. तेथील प्रमुख विरोधी पक्ष मालदीव डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) ने मोहम्मद मुइझु यांच्या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची पूर्ण तयारी केली आहे. एमडीपीने मोहम्मद मुइझु सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी पुरेशा खासदारांच्या सह्या गोळा केल्या आहेत. चीन समर्थक राष्ट्राध्यक्षांविरोधात महाभियोग प्रस्ताव लवकरच संसदेत मांडला जाण्याची शक्यता आहे.

हे वृत्त येण्यापूर्वी रविवारी मालदीवच्या संसदेत अराजकाची स्थिती पाहायला मिळाली. त्याचवेळी, चार मंत्रिमंडळ सदस्यांबाबत विरोधकांची मान्यता न मिळाल्याने मालदीवच्या संसदेत प्रचंड गदारोळ झाला आणि खासदारांमध्ये हाणामारी झाली. अशातच विरोधी पक्षांचे म्हणणे आहे की, मोहम्मद मुइझु यांच्या विरोधात महाभियोगाची प्रक्रिया सुरु करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे संख्याबळ आहे. विशेष म्हणजे, ते लवकरच त्यांच्याविरोधात मोठी कारवाई करणार आहेत.

यादरम्यान पीपल्स नॅशनल काँग्रेस (पीएनसी) आणि प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीव (पीपीएम) यांचा समावेश असलेल्या सत्ताधारी आघाडीच्या खासदारांची एमडीपीच्या खासदारांशी झटापट झाली.

Maldives President Mohamed Muizzu
Maldives Muizzu: मुइझ्झु यांच्याविरोधात आणला जाणार महाभियोग प्रस्ताव? मालदीव सरकारमध्ये गोंधळ का सुरुय?

खासदारांमधील भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये खासदार सभापतींच्या खुर्चीजवळ जमून मारामारी करताना दिसत आहेत. कांदिथिमुचे खासदार अब्दुल्ला हकीम शाहीम आणि केंदिकुलहुडूचे खासदार अहमद इसा यांच्यात मोठा वाद झाला आणि या भांडणात दोन्ही खासदार चेंबरजवळ पडले. यामध्ये शाहीम यांच्या डोक्याला दुखापत झाली. (A video of a fight between MPs went viral on social media)

MDP ने मतदानापूर्वी मोहम्मद मुइझुच्या मंत्रिमंडळातील चार खासदारांना संसदीय मान्यता रोखण्याचा निर्णय घेतला तेव्हा संसदेत गोंधळ सुरू झाला. यानंतर सरकार समर्थक खासदारांनी निदर्शने सुरू केल्याने अराजकाची स्थिती निर्माण झाली. या घटनेनंतर, मालदीवच्या न्यूज वेबसाइट Sun.mv ने आपल्या एका वृत्तात म्हटले आहे की, सत्ताधारी PPM-PNC आघाडीने संसदेचे अध्यक्ष मोहम्मद अस्लम आणि उपसभापती अहमद सलीम यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. मंत्रिमंडळाला संसदीय मान्यता न दिल्याने नागरी सेवांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याचे सत्ताधारी आघाडीने म्हटले आहे.

Maldives President Mohamed Muizzu
US Drone Attack: जॉर्डनमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला; तिघांचा मृत्यू, व्हाईट हाऊसचा गंभीर इशारा

मोहम्मद मुइझु भारताचे कट्टर विरोधक

राष्ट्रपती मोहम्मद मुइझु राष्ट्रपती निवडणुकीच्या प्रचारापासून भारतविरोधी भूमिका घेत आहेत. 'इंडिया आउट' या अजेंड्यावर ते सत्तेवर आले आणि येताच त्यांनी भारताला आपले सैन्य मागे घेण्यास सांगितले. अलीकडेच मोहम्मद मुइझु सरकारने भारताला मालदीवमधून आपले सैन्य १५ मार्चपर्यंत मागे घेण्याचा अल्टिमेटम दिला आहे. (Mohammad Muizu India's staunch opponent)

Maldives President Mohamed Muizzu
Pakistan : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात गंभीर आजाराचं थैमान; तीन आठवड्यांमध्ये 200 हून अधिक बालकांचा बळी

काही काळापूर्वी भारत आणि मालदीव यांच्यात लक्षद्वीप विरुद्ध मालदीव यावरून मोठा वाद झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर महिन्यात त्यांच्या लक्षद्वीप भेटीचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते, ज्यावर मालदीव सरकारच्या तीन उपमंत्र्यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती.

मालदीवच्या मंत्र्यांनी लक्षद्वीपला मालदीवपेक्षा निकृष्ट दाखवण्याचा प्रयत्न करताना आक्षेपार्ह टिप्पणी केली, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. या वादाच्या पार्श्वभूमीवर मोहम्मद मुइझु सरकारला आपल्या तीन उपमंत्र्यांना निलंबित करावे लागले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com