Nepal Plane Crash : थकलेला पायलट, जुनं विमान की तांत्रिक बिघाड...; नक्की अपघाताचं कारण काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nepal Plane Crash
Nepal Plane Crash : थकलेला पायलट, जुनं विमान की तांत्रिक बिघाड...; नक्की अपघाताचं कारण काय?

Nepal Plane Crash : थकलेला पायलट, जुनं विमान की तांत्रिक बिघाड...; नक्की अपघाताचं कारण काय?

नेपाळमध्ये रविवारी मोठा विमान अपघात झाला. नेपाळच्या पोखरा इथं यति एअरलाईन्सचं विमान ATR-72 क्रॅश झालं. पूर्ण तपासानंतर आता या अपघातामागचं कारण कळलं आहे.

यति एअरलाईन्सच्या या विमानाचं उड्डाण काठमांडूमधून झालं होतं. यामध्ये ६८ प्रवासी आणि ४ क्रू मेंबर होते. या अपघातात या सगळ्यांचाच मृत्यू झाला असल्याची माहिती हाती येत आहे. सोशल मीडियावरही या अपघाताचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

हेही वाचा: Nepal Plane Crash : १६ वर्षांपूर्वी विमान अपघातात पती गमावला, आज तीही…; लँडिंगनंतर मिळणार होतं प्रमोशन

नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठे विमान अपघात होत आहे. या विमानाने रविवारी काठमांडूमधून पोखराकडे जाण्यासाठी उड्डाण केलं होतं. या विमान अपघाताचा सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये स्पष्ट दिसतंय की आभाळ मोकळं आहे आणि वातावरणही स्वच्छ आहे.

हेही वाचा: Nepal Plane Crash : 72 जणांचा मृत्यूतांडव; अपघातापूर्वीचा भयानक Video आला समोर

या क्रॅशची चौकशी करणाऱ्या टीमच्या एका सदस्याने आजतकला दिलेल्या माहितीनुसार, या व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे विमानाचा वरचा भाग थोडा वर गेला आणि त्यानंतर विमानाचे पंख डाव्या बाजूला झुकले, अशा पद्धतीने हा अपघात झालेला असू शकतो. पण संपूर्ण सखोल तपास झाल्यानंतर या अपघाताचं कारण कळेल, असंही त्याने सांगितलं.

मात्र, विमानाची दिशा चुकणे, विमानातल्या सिस्टीमध्ये बिघाड किंवा थकलेला पायलट अशी काही या अपघाताची कारणं असू शकतात.

टॅग्स :Aeroplane