esakal | लॉकडाउनमध्ये ब्रिटनवासियांसाठी 'भांगडा' नृत्य ठरले ऊर्जेचा स्त्रोत
sakal

बोलून बातमी शोधा

online bhangra

भारतीय भांगडा नृत्य प्रकारामुळे चांगला व्यायाम होतो. यामुळे एक नवी ऊर्जा मिळते, असे राजीव गुप्ताचे मत आहे. संकटजन्य परिस्थितीत लोकांना आरोग्यदायी ठेवण्याच्या उद्देशाने गुप्ता यांनी हा प्रयोग राबवला.

लॉकडाउनमध्ये ब्रिटनवासियांसाठी 'भांगडा' नृत्य ठरले ऊर्जेचा स्त्रोत

sakal_logo
By
सुशांत जाधव

लंडन कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी जगभरातील अनेक राष्ट्रांवर लॉकडाउनसारखा कठोर निर्णय घेण्याची नामुष्की ओढावली आहे. कोरोनाचा कहर आणि त्याला थोपवण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे सर्वच क्षेत्रांना प्रभावित केले आहे. या संकटजन्य परिस्थितीत इंग्लंडमधील भारतीय वंशाच्या डान्सरने अनोखा उपक्रम राबवल्याचे पाहायला मिळाले. राजीव गुप्ताने ऑनलाइनच्या माध्यमातून भांगडा-व्यायाम स्वरुपात लोकांना फिट ठेवण्याचा फंडा आजमवला. त्याला उत्तम प्रतिसादही मिळाला. एवढेच नाही तर ब्रिटनचे पंतप्रधान जॉनसन बोरिस यांनी त्याची दखल घेतली.

कोरोनाच्या लसीसाठी आदर पुनावालांनी घेतली मोठी 'रिस्क'

ब्रिटन सरकारने भारतीय वंशाच्या डान्सरने राबवलेल्या उपक्रमाबद्दल त्याला 'पॉइंट्स ऑफ लाइट' सन्मानाने गौरवण्यात आले. सामाजिक कार्यातील योगदानासाठी ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येतो. भारतीय भांगडा नृत्य प्रकारामुळे चांगला व्यायाम होतो. यामुळे एक नवी ऊर्जा मिळते, असे राजीव गुप्ताचे मत आहे. संकटजन्य परिस्थितीत लोकांना आरोग्यदायी ठेवण्याच्या उद्देशाने गुप्ता यांनी हा प्रयोग राबवला. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी यासंदर्भात गुप्ता यांना एक पत्र लिहिले आहे. मागील काही दिवसांत तुमच्या ऑनलाइन उपक्रमामुळे लोकांना ऊर्जा देण्यास मदत झाली. कोरोनाविरोधातील लढ्यात घरात बसलेल्या लोकांमध्ये स्फुर्ती देण्याचे काम या उपक्रमामुळे साध्य झाले. बिकट परिस्थितीत अनेक लोकांसाठी तुम्ही 'पॉइंट ऑफ लाइट' ठरला, अशा शब्दांत पत्राद्वारे गुप्ता यांचे कौतुक करण्यात आले आहे.

जगभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

यापूर्वी ब्रिटन पंतप्रधान जॉनसन बोरिस यांनी भारतीय विवाह समारंभात करण्यात येणारे नृत्य आणि पंजाबी भांगडा नृत्याबद्दल आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या होत्या. त्यांच्या पूर्वीच्या पत्नी मरीना व्हीलर यांची आई दीप कौर पंजाबशी संबंधित होत्या. या अनुषंगाने जॉनसन बोरिस यांना भांगड्याप्रती वेगळे आकर्षण आहे. ब्रिटन सरकारने दिलेल्या पुरस्कारानंतर गुप्ता यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. 'लॉकडाउनच्या काळात भांगडा-व्यायामाच्या माध्यमातून लोकांना मदत करु शकलो याचा अभिमान असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली. पुरस्काराबद्दल त्यांनी सरकारचे मनापासून आभारही मानले.