'इथल्या' मुलीशी लग्न करा आणि दरमहा मिळवा तीन लाख रुपये

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

लग्न झाल्यावर पती आणि पत्नी दोघांनी या देशातच राहायला हवं. त्याचसोबत फक्त मुलालाच मुलगी पसंत पडायला नको तर, मुलीनेही मुलाला पसंती दिली पाहिजे.

जगात असा एक देश आहे जिथल्या मुलींशी तुम्ही लग्न केलं तर तुम्हाला कोणतीही नोकरी किंवा धंदा करायची अजिबात गरज नाही. या देशातील मुलीशी तुम्ही जर लग्न केलं तर करायची ती फक्त ऐश. कारण, हा देश इथल्या मुलीसोबत जो कोणी लग्न करणाऱ्याला तब्बल तीन लाख रुपये देतो. पैशांसोबत इथलं नागरिकत्त्व पण मिळतंय बरंका. 

याबाबतची माहिती एका संकेतस्थळावर प्रकाशित केली गेलेली. त्यानुसार लग्न झाल्यावर पती आणि पत्नी दोघांनी या देशातच राहायला हवं. त्याचसोबत फक्त मुलालाच मुलगी पसंत पडायला नको तर, मुलीनेही मुलाला पसंती दिली पाहिजे.

आणखी बातम्या वाचा

 

पाहता, पाहता ही बातमी व्हायरल झाली आणि इथल्या मुलींनी फेसबुकवर अनोळखी मुलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायला सुरवात केली. दरम्यान, हा सगळा प्रकार एव्हडा व्हायरल झाला आणि इथल्या सरकारला यामध्ये हस्तक्षेप करावा लागला.

वाढता गोंधळ लक्षात घेत सरकारने अधिकृतरीत्या घोषण केली की, सरकारने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. हा सगळा प्रकार घडलाय आईसलॅंड या देशात. आईसलॅंड या देशात 1007 पुरुषांमागे 1000 स्त्रिया असं इथलं स्त्री पुरुषांचं प्रमाण आहे. त्यामुळे सदर व्हायरल बातमी खोटी असल्याचं समोर आलंय.    

WebTitle : marry Icelandic girl and get three lakh rupees 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marry Icelandic girl and get three lakh rupees

टॅग्स