पाकिस्तान : माजी पंतप्रधानांकडून भारताचं कौतुक; मरियम नवाज म्हणाल्या, तिकडं भारतात खुशाल रहा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maryam Nawaz vs Imran Khan

भारतानं अमेरिकेच्या दबावाला बळी न पडता रशियाकडून स्वस्तात तेल विकत घेतलं आणि नंतर नागरिकांना दिलासा दिला.

माजी पंतप्रधानांकडून भारताचं कौतुक; मरियम नवाज म्हणाल्या, तिकडं भारतात खुशाल रहा

मरियम नवाज (Maryam Nawaz) यांनी भारताचं कौतुक करणाऱ्या पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना फटकारलंय. पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाजच्या उपाध्यक्षा मरियम नवाज यांनी म्हटलंय की, 'जर त्यांना (इमरान खान) भारत इतका आवडत असेल तर त्यांनी खुशाल तिथं जावं.' भारत सरकारनं (India Government) काल (शनिवार) पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात केलीय. यासोबतच उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 12 सिलिंडरवर वर्षभरात 200 रुपये प्रति सिलिंडर सबसिडी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

इम्रान खान यांनी आपल्या ट्विटमध्ये दक्षिण आशिया निर्देशांकाच्या अहवाल्याला टॅग केलं असून त्यात म्हटलंय की, रशियाकडून अनुदानित तेल खरेदी केल्यानंतर भारत सरकारनं पेट्रोलच्या दरात (Petrol Rates) प्रतिलिटर 9.5 रुपये, डिझेलच्या दरात प्रति लिटर 7 रुपयांची कपात केलीय. भारतानं अमेरिकेच्या दबावाला बळी न पडता रशियाकडून स्वस्तात तेल विकत घेतलं आणि नंतर नागरिकांना दिलासा दिला. हा भारत सरकारचा चांगला निर्णय होता. मात्र, आमच्याकडं असं होऊ शकलं नाही. सरकार उलथवण्यासाठी परकीय शक्तींची मदत घेण्यात आली. मात्र, त्यामुळं आमची अर्थव्यवस्था आणखी खाली आल्याचं इमरान खान यांनी म्हटलंय. भारतानं जे केलं तेच आम्ही करणार होतो. मात्र, आमचं सरकार टिकू शकलं नाही, असं देखील इमरान खान यांनी म्हटलंय.

हेही वाचा: राहुल बाबा.. इटालियन चष्मा काढा, तरच विकास दिसेल; अमित शाहांनी उडवली खिल्ली

काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांचं सरकार पाडण्यात आलं होतं. त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला. पाकिस्तानच्या राजकारणात अमेरिकेची (America) अवाजवी ढवळाढवळ आहे आणि त्यामुळंच आपल्या देशाचं स्वतंत्र परराष्ट्र धोरण नाहीय, असा आरोप इम्रान खान सातत्यानं करत आहेत. इम्रान यांच्या दृष्टीनं भारतानं स्वतंत्र परराष्ट्र धोरण बनवलंय, त्यामुळं त्यांना कोणाच्याहीपुढं झुकण्याची गरज नाहीय, असं त्यांनी नमूद केलं.

हेही वाचा: लालू यादवांचं कुटुंब पुन्हा अडचणीत; मुलीवर 'या' घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल

गेल्या दोन महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध (Russia and Ukraine war) सुरू आहे. या युद्धामुळं युक्रेनची प्रचंड प्रमान हानी झाली आहे. रशियानं युक्रेनमध्ये युद्धबंदीची घोषणा करावी अशी मागणी नाटोचे सदस्य असलेल्या अमेरिकेसह युरोपीय राष्ट्रांनी केली होती. मात्र, रशियानं युद्ध सुरूच ठेवल्यानं अमेरिकेकडून रशियावर अनेक आर्थिक निर्बंध घालण्यात आले. अमेरिकेने रशियाकडून कच्च्या तेलाची आयात देखील बंद केली. रशिया हा कच्च्या तेलाची निर्यात करणारा जगातील एक प्रमुख देश आहे. रशियामधून अमेरिका आणि युरोपीयन राष्ट्रांना मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची निर्यात केली जात होती. मात्र, अमेरिकेनं आयातीवर बंदी घातल्यानं रशियानं भारताला स्वस्त दरात कच्चे तेल देऊ केलं होतं. भारतानं देखील अमेरिकेच्या दबावाला न जुमानत सवलतीच्या दरातील कच्च्या तेलाची खरेदी केली. परिणामी देशात पेट्रोल, डिझेलच्या किमती स्वस्त झाल्या आहेत.

Web Title: Maryam Nawaz Criticizes Former Pakistan Pm Imran Khan Petrol Diesel Price India

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top