

China Shoe Factory Fire
ESakal
चीनच्या जिनजियांग शहरातील एका चपला बनवण्याच्या कारखान्यात गुरुवारी भीषण आग लागली, ज्यात २८ जणांचा मृत्यू झाला. आगीनंतर बचाव आणि मदत कार्याचे मार्गदर्शन करण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन मंत्रालयाने पूर्व चीनच्या फुजियान प्रांतातील जिनजियांग शहरात संयुक्त कृती दले पाठवली आहेत. मंत्रालयाने सांगितले की, ही आग दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास लागली.