मेहुल चोक्सी प्रत्यार्पण: भारतातून विमान डॉमिनिकामध्ये दाखल

डॉमिनिकाच्या डगलस-चार्ल्स विमानतळावर पोहोचलं विमान
मेहुल चोक्सी प्रत्यार्पण: भारतातून विमान डॉमिनिकामध्ये दाखल

नवी दिल्ली: मागच्या काही दिवसांपासून पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी मेहुल चोक्सी (Mehul Choksi repatriation) चर्चेत आहे. सध्या तो डॉमिनिका पोलिसांच्या ताब्यात आहे. भारतातून एक खास विमान डॉमिनिकाच्या डगलस-चार्ल्स विमानतळावर (Jet reaches to Dominica) पोहोचले आहे. अँटिग्वाचे पंतप्रधान गॅसटॉन ब्राऊनी यांनीच ही माहिती दिली आहे. (Mehul Choksi repatriation indian Jet reaches to Dominica)

"माझ्या माहितीनुसार मेहुल चोक्सी फरार आहे, हे सिद्ध करण्यासाठी भारत सरकारने कोर्टातील काही कागदपत्रे पाठवली आहेत. डॉमिनिकाच्या न्यायाधीशांनी मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाला बुधवारपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे कोर्टात सुनावणीच्यावेळी ही कागदपत्रे सादर करण्यात येतील. त्यामुळे मेहुल चोक्सीला मायदेशी नेण्यासाठी भारत सरकार त्यांच्या बाजूने पूर्ण जोरदार प्रयत्न करेल" असे ब्राऊनी यांनी एफएम चॅनलवर सांगितले. दरम्यान मेहुल चोक्सीचा तुरुंगातील एक फोटोदेखील आता समोर आला आहे.

मेहुल चोक्सी प्रत्यार्पण: भारतातून विमान डॉमिनिकामध्ये दाखल
पोलिसाने महिला पोलिसावर केला बलात्कार, घाटकोपरमधील घटना

बॉमबार्डीयर ग्लोबल ५००० जेट ऑफ कतार या विमानाने शनिवारी डॉमिनिकाच्या डगलस-चार्ल्स विमानतळावर लँडिंग केले. २८ मे रोजी नवी दिल्लीतून निघालेलं हे विमान माद्रिद मार्गे डॉमिनिकामध्ये पोहोचलं. हजारो कोटी रुपयाच्या पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीचे फोटो शनिवारी पहिल्यांदा समोर आले. तो तुरुंगात बंद आहे. त्याचे डोळे सुजलेले असून हातावरही जखमा आहेत. मागच्या तीन वर्षातील मेहुल चोक्सीचे हे पहिलेच समोर आलेले सार्वजनिक फोटो आहेत.

मेहुल चोक्सी प्रत्यार्पण: भारतातून विमान डॉमिनिकामध्ये दाखल
मुंबईत जूनमध्ये दुकानं उघडू शकतात पण...

मागच्या तीन वर्षांपासून तो कायदेशीर नागरिक म्हणून अँटिग्वामध्ये राहत आहे. घोटाळा उघड होण्याआधीच मेहुल चोक्सी देशाबाहेर पळून गेला होता. रविवार संध्याकाळपासून तो बेपत्ता होता. बुधवारी डॉमिनिका पोलिसांनी त्याला अटक केली. तेव्हापासून तो डॉमिनिका पोलिसांच्या ताब्यात आहे. अँटिग्वाच्या पंतप्रधानांना चोक्सीला पुन्हा देशात घ्यायचे नव्हते, त्याऐवजी त्याला थेट भारताकडे सोपवायचे होते. कारण मेहुल चोक्सी भारताचा गुन्हेगार आहे. डॉमिनिकाच्या न्यायालयाने त्याच्या प्रत्यापर्णावर स्थगिती आणली आहे. २ जूनला या प्रकरणी सुनावणी होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com