esakal | चोक्सी जामीन मिळाल्यानंतर अँटिग्वामध्ये परतला
sakal

बोलून बातमी शोधा

Mehul Choksi

न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर चोक्सी अँटिग्वा आणि बारबुडाला पोहोचला आहे.

चोक्सी जामीन मिळाल्यानंतर अँटिग्वामध्ये परतला

sakal_logo
By
सूरज यादव

कर्जबुडवा हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला डोमनिकामध्ये अटक करण्यात आली होती. तिथल्या न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर चोक्सी अँटिग्वा आणि बारबुडाला पोहोचला आहे. चोक्सीने जामीन अर्ज करताना वैद्यकीय अहवाल सादर केला होता. त्यामध्ये डोक्याशी संबंधित आजार असल्याचं आणि तो बळावल्याचं म्हटलं होतं. तसंच या उपचारासाठी आवश्यक सुविधा डोमनिकामध्ये नसल्याचंही सांगण्यात आलं होतं.

चोक्सीविरोधात डोमनिकामध्ये बेकायदेशीर प्रवेश केल्याचा आरोप आहे. तर त्याच्या वकिलांनी मात्र अपहरणकर्त्यांचा हा कट असल्याचा दावा केला. डोमनिका उच्च न्यायालयाने चोक्सीला उपचारासाठी जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने 10 हजार ईस्टर्न कॅरेबिनय डॉलरच्या जात मुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे. त्यानंतर चोक्सीला अँटिग्वाला जाण्याची परवानगी दिली आहे.

हेही वाचा: 'खायला अन्न नाही, मदत करा'; हुकूमशहा किम जोंग उन झाले हतबल

डोमनिकामध्ये बेकायदेशीर घुसखोरी केल्या प्रकरणी त्याला 51 दिवस ताब्यात घेण्यात आलं होतं. भारतातून फरार झाल्यानंतर चोक्सी 2018 पासून अँटिग्वामध्ये राहत होता. त्याने अँटिग्वाचे नागरिकत्वसुद्धा घेतलं आहे.

पीएनबीमध्ये 13 हजार 500 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी मेहुल चोक्सी वाँटेड आहे. तो 23 मे रोजी अँटिग्वामधून संशयास्पद रितीने बेपत्ता झाला होता. त्यानंतर शेजारी देश असलेल्या डोमनिकामध्ये चोक्सीला अटक करण्यात आली होती. तर चोक्सीच्या वकिलांनी आरोप केला होता की, 23 मे रोजी अँटिग्वाच्या जोली हार्बरमधून त्याचे काही पोलिस कर्मचाऱ्यांनी अपहरण केले होते. हे पोलिस कर्मचारी अँटिग्वा आणि भारताचे नागरिकांसारखे दिसत होते. त्यांनीच एका नावेतून चोक्सीला डोमनिकाला नेलं असा दावाही करण्यात आला.

loading image