
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी डाव्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय. जागतिक राजकीय डाव्यांच्या दुटप्पीपणावर टीका केलीय. मेलोनी यांनी शनिवारी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून वॉशिंग्टन डीसीतील कन्झर्वेहिटीव पॉलिटिकल एक्शन कॉन्फरन्सला संबोधित केलं. मेलोनी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, अर्जेंटिनाचे राष्ट्रपती जेवियर माइली यांसह जगभरातील नेते एका जागतिक कंझर्वेटिव्ह आंदोलनाला आकार देत आहेत.