टिकटॉकचा व्हिडिओ बनवताना सुटली गोळी अन् गेला जीव

वृत्तसंस्था
Friday, 9 October 2020

टिकटॉकसाठी व्हिडिओ बनवत असताना गोळी सुटल्याने युवतीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

न्यूयॉर्क: टिकटॉकसाठी व्हिडिओ बनवत असताना गोळी सुटल्याने युवतीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

Video: महामार्गावर कपडे काढून काढत होते छायाचित्र अन्...

टिकटॉकसाठी अनेकजण व्हिडिओ बनवत असतात. भारतात सध्या टिकटॉकला बंदी आहे. उत्तर अमेरिकेतील मेक्सिकोमध्ये एक धक्कादायक घडली आहे. मेक्सिकोमधील चिहुहुआ राज्यात टिकटॉकचा व्हिडिओ करत असताना गोळी लागल्याने युवतीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अरेलिन मार्टिन्ज असे मृत्युमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे. एका युवतीचे 10 जण अपहरण करत आहेत, असा व्हिडिओ त्यांना तयार करायचा होता. युवती आपल्या मित्रांसोबत एका छोट्या फार्म हाऊसमध्ये टिकटॉक व्हिडिओ शूट करत होती. त्यामध्ये युवतीचे हात बांधून तिच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली होती. दुसऱ्या व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला, असेही त्यांना दाखवायचे होते. पण, व्हिडिओ तयार करताना गोंधळ झाला आणि त्या व्यक्तीच्या हातून ट्रिगर दाबला गेला. युवतीला गोळी लागल्याने तिचा मृत्यू झाला. गोळीबारानंतर मित्रांनी घटनास्थळावरून पळ काढला.

पत्नीचे शिर हातात घेऊन चालत निघाला...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास करत आहोत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mexican girl accidentally shot dead while filming tiktok video